Mon, March 27, 2023

तुषार कामठे यांचा भाजपला रामराम
तुषार कामठे यांचा भाजपला रामराम
Published on : 15 February 2023, 2:05 am
पिंपरी, ता. १५ : भारतीय जनता पक्षाचे पिंपळे निलख-वाकड प्रभागाचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी बुधवारी (ता.१५) पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला रामराम केला आहे. ऐन विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामठे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शहर भाजपला हा मोठा झटका मानला जात आहे. कामठे कुठल्या पक्षात जातात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कामठे यांनी २०१२ मधील महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविली होती.