अश्र्विनी जगताप यांना
साथ द्यावी ः पंकजा मुंडे

अश्र्विनी जगताप यांना साथ द्यावी ः पंकजा मुंडे

पिंपरी, ता. १९ : युतीच्या सत्तेत पिंपरी-चिंचवडचे सर्व प्रश्न सोडवण्यात आले. चिंचवडच्या जनतेने अश्विनी लक्ष्मण जगताप यांना साथ देऊन, दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकिर्दीवर आणि त्यांनी केलेल्या विकासकामांवर प्रेम व्यक्त करावे, असे आवाहन भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (ता. १९) रहाटणी येथे केले.
चिंचवड पोटनिवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अश्विनी जगताप, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष भारत महानवर आदी उपस्थित होते.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, दिवंगत गोपीनाथ मुंडे खासदार झाले आणि केंद्रात मंत्री झाले. त्यानंतर सहाव्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला. या धक्क्यातून आमच्या कुटुंबांसह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांना सावरता आले नाही. गेलेल्या माणसाची जबाबादारी सांभाळताना काय कसरत करावी लागते, याची मला जाणीव आहे. आज दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनाही तशीच कसरत करताना मी पाहिले आहे. पती आपल्यामध्ये नाही हे दुःख बाजूला ठेवून संयम आणि जबाबदारीने त्या वागत आहेत. लोकांसमोर बोलत आहेत. एक स्त्री म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो.
फोटोः 15091

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com