शहरावर लादलेला शास्तीकर पूर्णपणे माफ करू देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन, ‘आंद्रा’चे पाणी दोन महिन्यांत येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरावर लादलेला शास्तीकर पूर्णपणे माफ करू
देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन, ‘आंद्रा’चे पाणी दोन महिन्यांत येणार
शहरावर लादलेला शास्तीकर पूर्णपणे माफ करू देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन, ‘आंद्रा’चे पाणी दोन महिन्यांत येणार

शहरावर लादलेला शास्तीकर पूर्णपणे माफ करू देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन, ‘आंद्रा’चे पाणी दोन महिन्यांत येणार

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. २३ ः आचारसंहिता संपल्याबरोबर पिंपरी चिंचवड शहरावर लादला गेलेला शास्तीकर पूर्णपणे माफ करण्यात येईल. यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. याचबरोबर आंद्रा धरणाचे पाणी आणण्याचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होईल. त्यामुळे शहराची तहान भागविण्याची गरज पूर्ण होईल, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगवी येथील पी. डब्ल्यू. डी. मैदानावर आयोजित प्रचार सभेत गुरुवारी (ता. २३) दिले.
भाजप महायुतीच्या चिंचवड विधानसभेच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारसभेत फडणवीस बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडीक, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उमेदवार अश्र्विनी जगताप, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, अमर साबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ, एकनाथ पवार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी महापौर उषा ढोरे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले
१) राज्यातील कोणत्याही महापालिकेत नसणारा मोगलांसारखा जिझिया कर अर्थात शास्तीकर राष्ट्रवादीवाल्यांनी पिंपरी चिंचवड शहरावर लादला.
२) आमच्या सरकारने एक हजार फुटांपर्यंतच्या बांधकामांना शास्तीकर माफ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो पूर्ण संपला पाहिजे, यासाठी आमचे सरकार आल्याबरोबर आम्ही विधानसभेत घोषणा केली.
३) राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहर बकाल केले.
४) दिवंगत कार्यसम्राट आमदार लक्ष्मण जगताप यांनी विकासाचा ध्यास घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्मार्ट शहराचे व्हीजन घेऊन शहराच्या विकासात मोठे योगदान केलेले आहे.
५) स्मार्ट शहराचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अश्विनी जगताप यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे

आठवले यांच्या काव्यांना दाद...
केंद्रीयमंत्री व रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी त्यांच्या काव्यात्मक विनोदी शैलीतून कॉंग्रेसवर बोचरी टीका केली. यावेळी उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
‘‘आप कितनी भी बढाओ दाढी, मोदीजी की मजबूत है बॉडी, मोदीजी को मालूम है, देशवासियोंकी नाडी, फिर उनके सामने कैसे चलेगी राहुलजी की गाडी...’’ या काव्यात्मक शैलीतून केलेल्या फटकेबाजीला उपस्थितांनी दाद दिली.
चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी प्रास्ताविक केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, अश्विनी जगताप आदींची भाषणे झाली.
चौकट -

सचिन साठे यांचा प्रवेश
सभेदरम्यान पिंपळे निलख येथील गेली अनेक वर्षांपासून कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष म्हणून काम पाहिलेले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन साठे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

फोटो ओळ -
सांगवी ः चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत अभिवादन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, शंकर जगताप, अश्विनी जगताप, खासदार श्रीरंग बारणे, हर्षवर्धन पाटील, उमा खापरे, चित्रा वाघ, खासदार धनंजय महाडीक, आमदार महेश लांडगे आदी.
फोटोः -26691,26690