मोरवाडी आयटीआयच्या
मेळाव्यात ३७३ युवकांना रोजगार

मोरवाडी आयटीआयच्या मेळाव्यात ३७३ युवकांना रोजगार

पिंपरी, ता. २२ : महापालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स (बानाई), महाराष्ट्र शासनाच्या पुणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यातर्फे मोरवाडी येथील महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) रोजगार मेळावा आयोजित केला होता. त्यात ५३५ उमेदवारांनी प्रत्यक्ष नोंदणी केली होती. त्यापैकी ३७३ उमेदवारांची प्राथमिक निवड झाली.
शहरातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रोजगार मेळावा आयोजित केला होता. त्यात टाटा मोटर्स, महिंद्रा सीआयइ ऑटोमोटिव्ह, केएसबी लिमिटेड, बिव्हिजी इंडिया लिमिटेड यांसारख्या ३८ नामांकित कंपन्या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. महापालिका प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपआयुक्त रविकिरण घोडके, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील, बानाईचे अध्यक्ष तथा प्रबोधनपर्वाचे संयोजक विजय कांबळे, पुणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते, जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी हनुमंत नलावडे, बानाईचे प्रतिनिधी प्रकाश दामोदरे, अनिल सूर्यवंशी, शामसुंदर बनसोडे, राहुल गायकवाड, प्रवीण शिंदे, स्वप्निल काकडे, महेश झगडे, प्रीती यादव उपस्थित होते.

कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर
प्रशासक सिंह म्हणाले, ‘‘शहरातील गरजू युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा व त्यांना कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते. औद्योगिक कंपन्यांमध्ये कुशल मनुष्यबळाची गरज असते. ती ओळखून महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागामध्ये विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख तसेच व्यवसायभिमुख प्रशिक्षण उत्तम पद्धतीने देण्यात येत आहे. आगामी काळात औद्योगिक आस्थापनांशी समन्वय साधून त्यांना अपेक्षित कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन महापालिकेचा औद्योगिक प्रशिक्षण विभाग अधिक सक्षम केला जाईल.’’

बानाईचे प्रतिनिधी प्रकाश दामोदरे यांनी रोजगार मेळाव्याचा उद्देश सांगितला. मोरवाडी आयटीआयचे कार्यालय अधीक्षक उमा दरवेश, गटनिदेशक मनोज ढेरंगे, रवींद्र ओव्हाळ, प्रकाश घोडके, ज्योत सोनवणे, मंगेश कलापुरे, नीलेश लांडगे, अमोल शिंदे, उज्ज्वला सातकर, अरुण बांबळे, शर्मिला काराबळे, पूनम गलांडे, जीवन ढेकळे, विक्रम काळोखे आदींनी संयोजन केले. विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी आभार मानले.

प्रशासक सिंह यांचा युवकांना कानमंत्र
- तांत्रिक ज्ञानाबरोबरच उत्तम संवाद कौशल्य आत्मसात करा
- मुलाखत देताना स्वतःला उत्तम पद्धतीने सादर करा
- रोजगार व व्यवसायभिमुख व्यवसाय प्रशिक्षण घ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com