वॉशिंग सेंटरसाठी 
पिण्याच्या पाण्याचा वापर

वॉशिंग सेंटरसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर

पिंपरी, ता. २२ : महापालिकेच्या जलवाहिनीतून नळजोड घेऊन शहरातील वॉशिंग सेंटरसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले. महापालिका पाणीपुरवठा विभागाने केलेल्या तपासणीत क क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात हा प्रकार उघडकीस आला. नेहरूनगर येथील तीन व भोसरी चक्रपाणी वसाहतीतील सहा अशा नऊ वॉशिंग सेंटरवर कारवाई करत अनधिकृत नळजोड खंडित केले. क क्षेत्रीय कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता, चार कनिष्ठ अभियंता, चार प्लंबर, दोन मीटर निरीक्षक व महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १६ जवान यांच्या पथकाने कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com