सायकलिंग, धावणे स्पर्धेत शहराचा प्रथम क्रमांक

सायकलिंग, धावणे स्पर्धेत 
शहराचा प्रथम क्रमांक
Published on

पिंपरी, ता. २२ : गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, स्मार्ट सिटी मिशन यांच्यातर्फे देशभरात फ्रीडम टू वॉक, सायकलिंग, धावणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या. यात पिंपरी-चिंचवड शहराने सायकलिंग व धावणे स्पर्धेत देशात प्रथम आणि चालण्याच्या स्पर्धेत दहावा क्रमांक पटकावला. वैयक्तिक पातळीवर महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अमित दीक्षित हे सायकलिंगमध्ये देशात प्रथम क्रमांक व कॉम्प्युटर ऑपरेटर अनंत चुटके यांनी चौथा क्रमांक पटकावला. धावणे प्रकारात कनिष्ठ अभियंता प्रसाद देशमुख यांचा देशात द्वितीय क्रमांक व कनिष्ठ अभियंता स्वप्नील शिर्के यांनी पाचवा क्रमांक पटकावला. स्पर्धेचा हा पहिला टप्पा होता. आणखी तीन टप्पे होणार आहेत. स्पर्धेसाठी देशातील ३० शहरातून १५० अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा ४५ दिवस म्हणजेच एक फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत झाली. यात शहरातील १० अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com