स्व. राजीव गांधी भाजी मार्केटची आरोग्य विभागाकडून स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्व. राजीव गांधी भाजी मार्केटची 
आरोग्य विभागाकडून स्वच्छता
स्व. राजीव गांधी भाजी मार्केटची आरोग्य विभागाकडून स्वच्छता

स्व. राजीव गांधी भाजी मार्केटची आरोग्य विभागाकडून स्वच्छता

sakal_logo
By

जुनी सांगवी, ता. ९ ः येथील महापालिकेचे मध्यवर्ती भागात बंद असलेले स्व. राजीव गांधी भाजी मार्केट मंडईत कचऱ्याचे ढीग साचल्याने स्वच्छतेअभावी दुरवस्था झाली होती. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र पहावयास मिळत होते. याबाबत ‘सकाळ’मधून सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. याची तत्काळ दखल घेत आरोग्य विभागाकडून येथील स्वच्छता करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जुनी सांगवी येथील स्व. राजीव गांधी भाजी मार्केटमधील ७६ गाळे धूळखात पडून होते. दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या वतीने येथील सुशोभीकरण करून भाजी मार्केट सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र विक्रेते संख्या जास्त व त्याप्रमाणात गाळे कमी, फेरीवाल्यांकडून होणारी भाजी विक्री, पालिकेचे न परवडणारे भाडे, छोटे बंदिस्त गाळे अशी कारणे देत काही दिवसातच या भाजी मार्केटकडे भाजी विक्रेत्यांनी पाठ फिरवली. गेल्या दोन वर्षांपासून पुन्हा ही भाजी मंडई धूळखात पडून राहिल्याने येथे दुर्लक्षामुळे कचरा साचून मार्केटची अस्वस्छतेमुळे दुरवस्था झाली होती. येथील नियमित स्वच्छता व देखभाल व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.