ऐटीत जगण्यासाठी आयटीत शिकणे गरजेचे- दिपक शिकरापुरकर

ऐटीत जगण्यासाठी आयटीत शिकणे गरजेचे- दिपक शिकरापुरकर

Published on

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा
करियरसाठी विचार व्हावा
डॉ. दीपक शिकारपूर यांचा सल्ला

पिंपरी ः रोज नवनवीन प्रगत तंत्रज्ञान विकसित होत आहे. आयटी क्षेत्रात करियरच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजे तंत्रज्ञानाद्वारे चालणारे काम. आज मानवी मेंदूद्वारे जसे आज्ञा देवून काम केले जाते. त्याचप्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात रोज नवनवीन प्रगत तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी केले. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता चॅट जीपीटी व त्याचा करिअर होणारा परिणाम’ या विषयावर ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘कृत्रिम यंत्राला निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होणे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. उदाहरणार्थ आज अनेक क्षेत्रात रोबोटद्वारे कामे केली जातात. त्याला निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त झालेली असते. आपल्या मेंदूला जे कळते, ते एखाद्या रोबोलाही कळण्याची क्षमता असणे ही तंत्रज्ञानातील कृत्रिम बुद्धिमत्ता होय. उदाहरणार्थ वीज चमकली की पाऊस येणार, हे कळते तसेच विकसित केलेल्या तंत्रज्ञानाद्वारे या गोष्टींचा प्रत्येक क्षेत्रात रोज उपयोग केला जातो आहे. रोबोटीक क्षेत्र हे येत्या काळात अधिक वेगवान असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडित अनेक संधी या क्षेत्रात उपलब्ध होत राहणार आहेत. ज्याला यात टेक्निकल कोर्सेस करायचे आहेत, त्यांच्यासाठी अनेक संस्थांनी यातील स्पेशालायजेशन कोर्सेस निर्माण केलेले आहेत. यात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, प्रोग्रॅमर, डेव्हलपर आदी बरीच क्षेत्रे करियरसाठी उपलब्ध आहेत. आगामी काळात परदेशी शिक्षणासाठी जाण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्नही आपल्याच देशात पूर्ण होणार आहे.’’
आगामी काळात परदेशी शिक्षण संस्था आपल्या भारतात शिक्षणाचे व्यासपीठ निर्माण करणार आहेत. यामुळे तंत्रज्ञानाद्वारे जग अजूनच जवळ येऊन यातून जगाच्या पाठीवर कुठेही या क्षेत्रात करिअर करण्यासाठी संधी प्राप्त होईल. अर्थातच संधी अनेक असल्यातरी ध्येय समोर ठेवून कष्ट करण्याची तयारी स्वतः त असली पाहिजे. यामुळे आयटी क्षेत्रात करिअर करण्यासाठी नक्कीच यशस्वी मार्ग सुकर होतील, असे डॉ. शिकारपूर यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.