

जुनी सांगवी, ता. ६ ः पिंपळे निलख रक्षक चौक ते विशालनगर फाटा या मुख्य रस्त्यावर असलेल्या पदपथाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. उघडे चेंबर व मातीच्या ढिगांमुळे नागरिकांना कसरत करावी लागत आहे. उघड्या चेंबरमुळे पावसाळ्यात अपघाताचा धोका टाळण्यासाठी येथील काम गतीने पूर्ण करावे, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सांगवी फाटा ते रक्षक चौक विशाल नगर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला सायकल ट्रॅक, पदपथ, सुशोभीकरणाची कामे करण्यात आलेली आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम संथ गतीने सुरू आहे. पावसाळ्याआधी हे काम पूर्ण होऊन, नागरिकांसाठी हा ट्रॅक खुला होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, जुलै सुरु झाला तरी येथील किरकोळ कामे सुरूच असल्याने याचा रहदारीसाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. उघडे असलेले चेंबर, पदपथावर टाकण्यात आलेली माती पावसामुळे अस्ताव्यस्त होऊन रस्त्यावर येत असल्याने अपघाताचा संभाव्य धोका आहे. मुख्य रस्ता असल्याने या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. अशातच पादचाऱ्यांनी चालायचे कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. उघड्या चेंबरमुळे येथे अपघाताचा संभाव्य धोका आहे. मुख्य रहदारीचा रस्ता, अरुंद झालेला मुख्य रस्ता व पदपथाचे अर्धवट संथगतीने सुरू असलेले काम यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन येथून मार्गक्रमण करावे लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने येथील काम गतीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सद्यःस्थितीत येथील पदपथामळे मुख्य रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे सध्या या रस्त्यावर अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. यातच पदपथाचे अपूर्ण काम, मातीचे ढीग यामुळे नागरिकांना रहदारीसाठी कसरत करावी लागत आहे.
-शिरिष साठे, शहर सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस
‘‘येथील काम किरकोळ कामे वगळता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. येथील स्वच्छतेची कामे करण्यात येतील. येत्या दोन महिन्यांत हा पदपथ नागरिकांसाठी पूर्ण होऊन, खुला करण्यात येईल.
- मनोज सेठिया, प्रकल्प प्रमुख, अधिकारी स्मार्ट सिटी
पिंपळे निलख ः रक्षक चौक सोसायटी ते विशाल नगर फाटा मुख्य रस्त्यालगत पदपथावर उघडे चेंबर व मातीच्या ढिगांमुळे नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
फोटो ः 15896, 15897
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.