महिला बचतगटाची सांगवीत डिजिटल साक्षरता उत्साहात

महिला बचतगटाची सांगवीत डिजिटल साक्षरता उत्साहात

जुनी सांगवी, ता. १० ः येथे महापालिका महिला आर्थिक विकास व आरंभ महिला प्रतिष्ठान, फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन यांच्या वतीने महिला बचत गट डिजिटल साक्षरता कार्यशाळा झाली.
सामाजिक आर्थिक चळवळीचे केंद्र बनलेल्या महिला बचतगटांना सध्याच्या तंत्रज्ञान व व्यवहार साक्षरतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे, मेल आयडी, पत्रव्यवहार, जमा खर्च, प्रोसिडिंग विविध योजनांची ऑनलाइन माहिती डिजिटल स्वरूपात समजण्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे सांगवी येथे आयोजन करण्यात आले होते. महिला बचत गटातील उद्योजक महिलांना काळानुरूप बदल झालेल्या डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकासह धडे देण्यात आले. अनेकदा महिलांकडे स्वतःचे कलागुण, कौशल्य असतानाही नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग साधता येत नसल्याने उद्योग व्यवसायाचे मार्केटिंग व बाजार पेठ मिळत नाही. यासाठी महिला बचत गटांना डिजिटल साक्षर करणे गरजेचे असल्याचे या कार्यशाळेच्या आयोजक तृप्ती कांबळे अध्यक्षा आरंभ महिला प्रतिष्ठान यांनी सांगितले. या कार्यशाळेत चाळीस महिला बचत गटातील प्रमुख सदस्यांनी सहभाग घेत कार्यशाळा पूर्ण केली. कार्यशाळेत स्वाती दुधाळे, संदीप पाटोळे, अर्चना होनराव यांनी उपस्थित महिलांना डिजिटल साक्षरतेचे धडे देत मार्गदर्शन केले. या वेळी माजी नगरसेवक संतोष कांबळे, फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन पदाधिकारी कार्यशाळेस उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com