वाखारे कॉलनीतील पाणी प्रश्‍न अखेर मार्गी

वाखारे कॉलनीतील पाणी प्रश्‍न अखेर मार्गी

जुनी सांगवी, ता. ११ ः फुगेवाडी येथील बारा वर्षांपासून रखडलेला पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने गावकऱ्यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा सोमवारी (ता.१०) सत्कार करण्यात आला. कासारवाडी येथील महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी जनसंवाद सभा झाली. जनसंवाद सभेत एकूण सात तक्रारी दाखल झाल्या. यामध्ये संत तुकाराम नगर, दापोडी, फुगेवाडी, जुनी सांगवी, सांगवी येथील भागांचा समावेश होता. तक्रारीचे मुख्य समन्वय अधिकारी यांनी तक्रारीचे निरसन केले.

यावेळी मुख्य समन्वय अधिकारी अजय चारठणकर, क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, स्थापत्य अभियंता राजेश जावळे, विद्युत कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ, स्मार्ट सिटी आणि पाणीपुरवठा अभियंता चंद्रकांत मोरे यांच्यासह आदी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
फुगेवाडी येथील वाखारे कॉलनीतील नागरिकांचा गेली बारा वर्षांपूर्वीपासून रखडलेला पाणी पुरवठा प्रश्न ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत मार्गी लागला. येथील वाखारे कॉलनी परिसरात महापालिकेकडून नव्याने पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली.

त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. याआधी महापालिकेकडे तक्रार अर्ज दाखल करून देखील प्रश्न सुटत नव्हता. मागील दोन जनसंवाद सभेत मुख्य समन्वय अधिकाऱ्यांपुढे तक्रारी घेऊन नागरिकांनी गाऱ्हाणे मांडले. यावेळी मुख्य समन्वय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांच्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारीची त्वरित दखल घेतली. याबद्दल फुगेवाडीतील नागरिक प्रा. मनोज वाखारे, धनंजय वाखारे यांनी मुख्य समन्वय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

‘‘ गेली अनेक वर्षांपासून येथील प्रश्न रखडला होता. प्रशासनाकडून येथील काम करण्यात आले आहे.’’
- मनोज वाखारे नागरिक.

‘‘ जनसंवाद माध्यमातून रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यात प्रशासनाला यश आले आहे. नागरिक कामाची दखल घेतात ही चांगली बाब आहे.’’
ःः- अजय चारठणकर, मुख्य समन्वय अधिकारी

‘‘ मागील दोन जनसंवाद सभेत फुगेवाडी येथील नागरिकांनी तक्रार मांडली होती. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वयातून येथील प्रश्न मार्गी लावला. त्याची दखल घेत गावकऱ्यांकडून कौतुक झाल्याने समाधान वाटत आहे.’’
- उमेश ढाकणे, क्षेत्रीय अधिकारी.


कासारवाडी ः फुगेवाडी येथील बारा वर्षांपासून रखडलेला पाणी प्रश्न सुटल्याने नागरिकांकडून प्रशासन अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com