पोलिसांच्या सायकल स्पर्धेत 
सतीश सावंत महाराष्ट्रातून प्रथम

पोलिसांच्या सायकल स्पर्धेत सतीश सावंत महाराष्ट्रातून प्रथम

जुनी सांगवी, ता. ३१ ः सासवड ते बारामती ८५ कि.मी. पोलिसांच्या राज्यस्तरीय सायकल स्पर्धेत नवी सांगवी येथील पोलिस हवालदार सतीश सावंत यांनी प्रथम क्रमांक मिळवत महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
महाराष्ट्र पोलिस दलातील विविध जिल्ह्यांमधून ४० पोलिस सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. सावंत यांनी याआधी पुणे ते हम्पी तीन दिवसांत सायकलवरून पूर्ण केले होते. पुणे ते पंढरपूर वारी, कुंभार्ली ते चिपळूण किंग ऑफ कुंभार्ली घाट, मास स्टार्ट सिंहगड, बालेवाडी ते लोणावळा रिटर्न या स्पर्धेतून त्यांनी पारितोषिके मिळवलेली आहेत. महिला गटात सारिका पाटील यांनी द्वितीय, पुरुष गटात एपीआय इंद्रजित वर्धन सोलापूर यांनी द्वितीय, अतुल कडू नागपूर एसआरपी गट ४ द्वितीय तर गौरव गजभिये, जगदीश अत्राम यांनी सहभाग घेत कांस्य पदकाचे मानकरी ठरले आहेत.

‘‘स्पर्धात्मक सायकलींग आणि आनंदासाठी सायकल चालवणे यात खूप फरक आहे. बहुतेक जणांना स्पर्धात्मक सायकलींगची जास्त माहिती नसतानाही सर्व सहभागी पोलिस सायकलपट्टूंनी खूपच छान सायकल चालवली.’’
- मिलिंद झोडगे, सहायक पोलिस निरीक्षक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, सायकलींग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com