दापोडीतील पवना घाटावर बकालपणा 
सुविधांची वाणवा ः गवत व खुरट्या झाडांची मोठ्या प्रमाणात वाढ

दापोडीतील पवना घाटावर बकालपणा सुविधांची वाणवा ः गवत व खुरट्या झाडांची मोठ्या प्रमाणात वाढ

Published on

रमेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
जुनी सांगवी, ता. १७ ः दापोडी येथील पवना नदी काठावरील पवना घाटावर गवत, खुरटी झाडे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. घाटाची नियमित स्वच्छता व देखभाल होत नसल्याने घाट परिसराला बकालपणा आला आहे. गणपती उत्सव, छट पूजा, श्रावणमास, अधिक मास व इतर धार्मिक कार्यक्रम विधीसाठी घाटावर पारंपरिक पूजा विधी करण्यात येतात. मात्र, घाटावर सोयी सुविधांची वानवा, अस्वच्छतेमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सीमा भिंतीचा अडथळा
पुराच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे, निर्माल्य कचरा नदीपात्रात जाऊ नये, यासाठी घाटाच्या अलीकडे स्थापत्य विभागाकडून सीमाभिंत बांधण्यात आली आहे. घाटावर ये जा करण्यासाठी पायऱ्याची व्यवस्था नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना घाटावर ये- जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. भिंत बांधताना घाटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधण्याचा स्थापत्य विभागाला विसर पडल्याने नागरिकांना येथे ये- जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अनेक महिला या भिंतीवरच पूजा विधी आटपत असल्याचे चित्र आहे. यामुळे भिंतीवरून ये जा करण्यासाठी पायऱ्या कराव्यात, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

रस्त्याची दुरवस्था
विविध सण उत्सव, धार्मिक कार्यक्रम, छट पूजा यासारखे कार्यक्रम पवना घाटावर साजरे करण्यात येतात. ही बाब लक्षात घेऊन उत्सव काळात होणारी गर्दी पाहता येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, नदीकाठ परिसर असल्याने पुरेशा प्रकाशाची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. सध्या सण उत्सवाची सुरवात झाल्याने प्रशासनाकडून येथील घाट स्वच्छता, रस्ता डांबरीकरण, उजेडाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

‘‘घाट परिसरात गवत वाढले आहे. सणांचा काळ असल्याने नागरिकांना अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबर डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. येथे स्वच्छता करण्यात यावी.
-संजय काटे, माजी नगरसेवक

‘‘येथील प्रश्नांबाबत वरिष्ठांना कळविले आहे. सीमा भिंतीबाबत माहिती घेऊन येथे कार्यवाही करण्यात येईल. स्वच्छतेबाबत संबंधित विभागाला सांगण्यात येईल.
- श्यामसुंदर भंडारी, अभियंता, स्थापत्य दापोडी विभाग
फोटो ओळ- १)
दापोडी ः पवना घाटावर गवत व खुरटी झुडपे वाढल्याने घाटाला बकालपणा आला आहे. (दुसऱ्या छायाचित्रात) घाटाच्या अलीकडे बांधलेल्या भिंतीला पायऱ्या नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिकांना घाटावर जाता येत नाही.

फोटोः 16181, 16182, 16183

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com