काळेवाडी - रहाटणी रस्ता की वाहनतळ?
दिवस- रात्र वाहने पार्क केल्यामुळे वाहतुकीची कोंडी

काळेवाडी - रहाटणी रस्ता की वाहनतळ? दिवस- रात्र वाहने पार्क केल्यामुळे वाहतुकीची कोंडी

Published on

काळेवाडी, ता. १८ : तापकीर चौक, कुणाल हॉटेल ते नखाते वस्ती चौकाला जोडणाऱ्या लिंक रोडच्या दोन्ही बाजूला खासगी वाहने पार्क केली जातात. त्यामुळे हा रस्ता खासगी वाहनतळ बनला असून, सकाळ- संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
महापालिका विकास आराखड्यातील १२ मीटर रुंद काळेवाडी व रहाटणीला जोडणाऱ्या या मुख्य रस्त्याचे कोट्यवधी रुपये खर्चून कॉंक्रीटीकरण करण्यात आले. दोन्ही बाजूला पदपथ तयार केले आहेत. मात्र, प्रशस्त रस्त्याचा सध्या खासगी वाहने लावण्यासाठी वापर होत आहे. दिवसरात्र ही वाहने रस्त्यावर लावलेली असतात. अनेक वाहने महिनोंमहिने एकाच जागेवर धूळखात पडलेली दिसून येतात. त्याचा रहदारीस अडथळा निर्माण झाला असून, याबाबत सांगावे तरी कोणाला असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे.

पदपथावर अतिक्रमण
शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक येथून ये-जा करतात. मात्र, अनेक ठिकाणी पदपथावर वाहने लावली जात असून, अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे तर अनेक विद्युत डीपी बॉक्स पदपथावर अडथळा निर्माण करत आहेत. काही ठिकाणी पदपथ एकसंध न बनविल्याने पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरूनच जीव मुठीत घेऊन चालावे लागते. तसेच ३० ते ४० फूट जागा ताब्यात नसल्याने तेथे पदपथाचे काम रखडले आहे.

प्रतिक्रिया
‘‘आजूबाजूच्या कॉलन्यांमध्ये राहणारे ड्रायव्हर या रस्त्यावर वाहने आणून लावतात. कॉलनीत जागा नसल्याने पार्किंगला या रस्त्याचा वापर होतो. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. यावर पर्याय म्हणून या रस्त्यावर ‘नो पार्किंग झोन’ तयार करणे गरजेचे आहे.
सागर कोकणे, नागरिक

……………

फोटो ः 16203

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com