सहकारी गृहनिर्माण संस्थेची बेकायदा नोंदणी
पिंपळे सौदागरमधील प्रकार, प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

सहकारी गृहनिर्माण संस्थेची बेकायदा नोंदणी पिंपळे सौदागरमधील प्रकार, प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

पिंपळे सौदागर, ता. १३ : येथील लक्षदीप पॅलेस अपार्टमेंट्स व जरवरी हाऊसिंग सोसायटीच्या विकसकाने कन्व्हेयन्स डिड नोंदणीकृत केलेले होते. मात्र, व्यवस्थापन समितीने बेकायदेशीररीत्या उपनिबंधक कार्यालयातून सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र मिळवले आहे. असा आरोप रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आली आहे.
या दोन्ही गृहप्रकल्पांची विकासकाने महाराष्ट्र अपार्टमेंट्स ओनरशीप अॅक्टनुसार नोंदणी केली. तसेच या दोन्ही सोसायटीत व्यवस्थापन समिती स्थापन करून, त्या समितीकडे गृहप्रकल्प हस्तांतरित केला. मात्र, सोसायटी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मेंटेनन्स चार्जेसच्या नावाखाली आर्थिक फायदा करून घेता येईल. या उद्देशाने दुसऱ्यांदा बनावट कागदपत्रे सादर करून सहकार कायद्यांतर्गत सहकारी गृहरचना संस्थेची नोंदणी करून घेतली. असा आरोप रहिवासी व निवृत्त प्रशासकीय अधिकारी यशवंत चौधरी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हा उपनिबंधक व पुणे शहर ३ उपनिबंधक यांच्याकडे निवेदन सादर करून चौकशीची मागणी केली आहे.

चौकट:
नियम काय सांगतो
जर बिल्डरने अपार्टमेंट अॅक्ट १९७० खाली डीड ऑड डिक्लेरेशन केले असेल व त्यानंतर प्रत्येक प्लॅटचे डीड ऑफ अपार्टमेंट केले असेल अशा प्रसंगी या इमारतीची सहकारी कायद्यांतर्गत सहकारी गृहरचना संस्थेची नोंदणी करता येत नाही.

कोट :
लक्षदीप व जरवरी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी नियमबाह्य उपनिबंधक कार्यालयातून सहकारी गृहरचना संस्था मर्यादित असे नोंदणी प्रमाणपत्र मिळवले आहे. त्यासाठी मोठी प्रमाणात पैसा खर्च केला. अपार्टमेंट अॅक्टनुसार कारपेट एरियानुसार मेंटेनन्स घेतला जातो. मात्र, सहकारी संस्थेत प्रत्येकाला समान मेंटेनन्स द्यावा लागतो. त्यामुळे १ बीएचके व ३ बीएचके मालकांकडून सारखाच मेंटेनन्स वसूल केला जातो. तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थेत अध्यक्ष व सचिव गृहप्रकल्पाचे मालक बनतात. त्यामुळे माझा लढा चालू आहे.
यशवंत चौधरी, तक्रारदार, रहिवासी.
……….

हे प्रकरण २०१५-१६ चे असून, द महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप अॅक्टनुसार डिक्लेरेशन डीड झाली होती. नंतर ते रद्द करण्यात आले. याबाबत चौधरी यांनी निवेदन दिले आहे. आमचे माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
- नागनाथ कंजेरी, उपनिबंधक, पुणे शहर ३.
……….
आमच्या सोसायटीचे लक्षदीप पॅलेस को.ऑप हाउसिंग सोसायटी लि. या नावाने पूर्ण नोंदणी ऑनलाइन दिसत आहे. याबाबतची कागदपत्रे जिल्हा उपनिबंधक व उपनिबंधक पुणे शहर ३ यांना दाखवली असता, त्यांनी आमची कागदपत्रे बरोबर असल्याचे सांगितले.
- संदीप कौशिक, चेअरमन, लक्षदीप पॅलेस को. ऑप हाउसिंग सोसायटी.
………
तक्रारदाराकडे तीन लाखांपर्यंत थकबाकी आहे. त्याला मेंटेनन्स द्यायचा नाही, त्यामुळे तो आरोप करत आहे. तसेच याबाबत शासकीय कार्यालयात अर्ज देत असतो. मुळात फ्लॅटची मालक त्याची पत्नी आहे.
- रवींद्र पाटील, चेअरमन, जरवरी को.ऑप हाउसिंग सोसायटी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com