नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरांना विद्युत रोषणाई

नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरांना विद्युत रोषणाई

नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरांना विद्युत रोषणाई

पिंपरी, ता. १२ ः नवरात्रोत्सवाला रविवारपासून सुरुवात होत आहे. आदिशक्तीच्या उत्सवासाठी शहरातील विविध मंदिरांमध्ये जय्यत तयारी दिसून येत आहे. मंदिरांची साफसफाई त्यांची रंगरंगोटी करण्याबरोबर आकर्षक अशी सजावटही केली जात आहे. नवरात्रातील नऊ दिवसांमध्ये सर्वत्र आदिशक्तीचा जागर केला जातो. परंपरेनुसार नऊ दिवस नऊ कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमांची रुपरेषा देखील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून आखली जात आहे.

दुर्गा टेकडी उद्यान येथील दुर्गा देवी मंदिराचे यावर्षी नव्याने रंगकाम करण्यात येत असून, मंदिराला विद्युत रोषणाई केली जात आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात हे मंदिर सकाळी सहापासून रात्री आठपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे, अशी माहिती उद्यान विभागाकडून देण्यात आली. आकुर्डी येथील तुळजा भवानी मंदिरातही नवरात्रीची तयारी सुरू आहे. मंदिराचा परिसर सुशोभित केला जात आहे. मंदिराला आकर्षक रोषणाई देखील करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवातील नऊ दिवस मंदिरात पिंपरी-चिंचवडमधील भाविकांची मोठी गर्दी होते. हे लक्षात घेऊन दर्शन रांग तयार करण्यात येत आहे. आलेल्या भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी मंडप टाकला जात आहे. हे मंदिर मुंबई-पुणे महामार्गालगत असल्याने वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मंदिर परिसराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आलेले आहेत.
पिंपरी येथील वैष्णोदेवी मंदिरामध्येही देवीच्या दर्शनासाठी हजारो नागरिक गर्दी करीत असतात. सकाळी साडेचार वाजता घटस्थापना होणार आहे. दरवर्षी या नऊ दिवसात मंदिरात सकाळी व संध्याकाळी आरती केली जाते. मंदिरात भजन, मंत्रपठण, होम असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अष्टमीच्या दिवशी येणाऱ्या भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. या वर्षी मंदिराला लाल रंगाचा मंडपाने सजावट करण्यात आली आहे. नऊ दिवसांत रोज देवीच्या गाभाऱ्याला विविधरंगी फुलांनी सजावट केली जाणार आहे.


मंडळांचीही लगबग
गणपतीप्रमाणेच नवरात्रातही शहरातील मंडळांकडून देवीची स्थापना केली जाते. घट बसविले जातात. या मंडळांची तयारीही अंतिम टप्प्यात आलेली आहे. मंडळांनी साकारलेले देखावे व रोषणाई यांचे काम पूर्ण करण्याची लगबग दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com