नृत्यतेज ॲकॅडमीतर्फे नृत्य महोत्सव

नृत्यतेज ॲकॅडमीतर्फे 
नृत्य महोत्सव

पिंपरी, ता. ३० ः नृत्य दिनानिमित्त निगडी येथील नृत्यकला मंदिर व नृत्यतेज ॲकॅडमीच्यावतीने आयोजित करण्यात आलेला नृत्य महोत्सव संपन्न झाला. या नृत्य महोत्सवाच्या समारोपावेळी अभिनेते मयुरेश पेम, मनमित पेम, लावणी नृत्य दिग्दर्शक महेंद्र बनसोडे, नृत्यदिग्दर्शक जितेंद्र गुजराती, डॉ. दीपक शहा, डॉ. शाळिग्राम भंडारी, डॉ. अनिकेत काळोखे, संचालिका तेजश्री अडीगे आदी मान्यवर उपस्थित होते.

या नृत्यमहोत्सवात महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित नृत्य सादर करण्यात आले. वक्रतुंड महाकाय या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात
झाली. शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्य, कोळीनृत्य व नृत्यदिग्दर्शक महेंद्र बनसोडे यांनी सादर केलेल्या वासुदेव नृत्यास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्य पातळीवर झालेल्या स्पर्धांमधून प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धकांनी यावेळी अनेक नृत्य सादर केली. पुरस्कारार्थी पुरुष लावणी कलावंत फिरोज मुजावर यांनी सादर केलेल्या सवाल-जवाब लावणीला रसिकांनी टाळ्यांची दाद दिली. अकरा ते चौदा वयोगटातील विद्यार्थिनींनी गोंधळी गीत, ठाकर, जोगवा आदी नृत्य सादर केले. तर कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात कंटेम्पररी या नृत्यशैलीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे नृत्य दाखवण्यात आले. नृत्य कला मंदिराच्या ७५ विद्यार्थिनींनी वेगवेगळे नृत्य प्रकार तन्मयतेने व जोशपूर्ण सादर केले.
यातील अठरा मुलींचा उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून गौरव करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com