एकमेव मद्यपी चालकावर 
अडीच वर्षात कारवाई  
पिंपरी चिंचवड ‘आरटीओ’च्या दृष्टीने वाहनचालक सुधारले
दीड हजार चालकांची तपासणी

एकमेव मद्यपी चालकावर अडीच वर्षात कारवाई पिंपरी चिंचवड ‘आरटीओ’च्या दृष्टीने वाहनचालक सुधारले दीड हजार चालकांची तपासणी

पिंपरी, ता. २३ : पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) गेल्या अडीच वर्षात
दीड हजार चालकांची ‘ब्रेथ ॲनालायझर’द्वारे तपासणी करण्यात आली. मात्र, त्यामध्ये केवळ एकच वाहनचालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा आढळून आला.
ॊआरटीओकडून विविध महामार्गांवर जादा वेग, सीटबेल्ट नसणे, ओव्हरलोड, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक अशा विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते. तसेच ‘ब्रेथ ॲनालायझर’द्वारे तपासणी करून, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई केली जाते.
पिंपरी-चिंचवड आरटीओने जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२४ दरम्यान १ हजार ४५५ वाहन चालकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली. यात केवळ एकच बसचालक दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे आढळून आले. अवजड सामानाची वाहतूक करणारे वाहनचालक सर्रास दारू पिऊन वाहन चालवताना दिसून येतात. पण, आरटीओकडून केलेल्या कारवाईत केवळ एकच वाहनचालक ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’प्रकरणी दोषी आढळल्याची नोंद आहे.
---------------------
कारवाईचा फार्स
कल्‍याणीनगर येथे हिट अँड रनची घटना घडल्‍यानंतर राज्‍यभरातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. या पार्श्वभूमीवर चारचाकी वाहनधारकांची ‘आरटीओ’कडून तपासणीचा केवळ फार्सच केल्‍याचे दिसत आहे. अडीच वर्षांची आकडेवारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र, या आठवड्यात एकही कारवाई केली नसल्‍याची माहिती देण्यात आली.
--------------------------------
‘‘ब्रेथ ॲनालायझर’द्वारे वाहनधारकांची तपासणी करत आहे. गेल्या आठवड्यात एकही मद्यपी वाहनधारक आढळला नाही. यापूर्वी केलेल्या कारवाईत एकावर कारवाई केली आहे.
- अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com