मातृत्व हे विश्वात्मक ः प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

मातृत्व हे विश्वात्मक ः प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

Published on

पिंपरी, ७ : ‘‘ज्याप्रमाणे दुःख हे डावे - उजवे नसते, त्याप्रमाणे मातृत्व हे विश्वात्मक असते. ते जात, धर्म या पलीकडचे असते,’’ असे विचार प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी व आशिया मानवशक्ती विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील ऑटोक्लस्टरमध्ये आई कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्य कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, आशिया मानवशक्ती विकास संस्थेचे अध्यक्ष बाजीराव सातपुते, ज्येष्ठ प्रकाशक नितीन हिरवे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात कमल खांदवे, राणूबाई उमाप, वत्सला सातपुते, विमल मरळे, सुभद्रा वाल्हेकर या मातांना राजमाता जिजाऊ कृतज्ञता सन्मान प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, ग्रंथ आणि शाल असे सन्मानाचे स्वरूप होते. यानिमित्त, बाजीराव सातपुते लिखित ‘थोरांच्या पाऊलखुणा’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
पुरुषोत्तम सदाफुले यांनी सन्मानार्थींशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. तत्पूर्वी, सुवासिनींच्या हस्ते पाचही मातांचे पूजन करून तसेच ओवी सातपुते हिच्या हस्ते झाडाचे पूजन करण्यात आले. मानसी चिटणीस यांनी मानपत्राचे वाचन केले. अरुण गराडे, राजेंद्र वाघ, प्रभाकर वाघोले, जयवंत भोसले, फुलवती जगताप यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. सायली संत यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.