डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेत 
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

जुनी सांगवी, ता. १० ः बोपोडी येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. या वेळी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी व त्यांच्या शिक्षकांनी २१ वर्षांनी पुन्हा शालेय आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी सध्या विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. कोणी विद्याविभूषित, पोलिस दलात, सैन्यात, नोकरीत, व्यवसायात स्थिरावले परंतु यामध्ये हे सर्वजण २१ वर्षांनी पुन्हा एकदा विद्यार्थी बनले व आपापल्या वर्गात जाऊन बाकावर बसले. त्याचप्रमाणे शिक्षकदेखील त्यांच्या माजी विद्यार्थ्यांबरोबर गप्पा गोष्टीत रमले. यापैकी काही शिक्षक सेवानिवृत्त झाले. तथापि सेवानिवृत्तीनंतरही माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात आवर्जून उपस्थित राहिले. शिक्षक कमलाकर पाटील, रंजना टंकसाळे, वाल्मीक हजारे, देविदास सरोदे, दिलीप काटे, विलासराव सुर्वे, जयराम पारधी आणि राजश्री मांढरे, चंदुमामा गद्रे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com