श्री फिरंगाई देवीचे नवरात्रोत्सव उत्साहात सुरू

श्री फिरंगाई देवीचे नवरात्रोत्सव उत्साहात सुरू
Published on

जुनी सांगवी, ता.३ ः दापोडीचे ग्रामदैवत आणि पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री फिरंगाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, कासारवाडी, फुगेवाडी, जुनी सांगवी आदी परिसरामधून भाविक दर्शनाला येत आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी पुणे-मुंबई महामार्गाच्याकडेला हेमाडपंथी शैलीत श्री फिरंगाई देवीचे मंदिर बांधण्यात आले आहे. भाविकांची इच्छापूर्ती करणारी देवी असल्याची तिची ख्याती आहे. कुरकुंभ हे देवीचे मूळ स्थान आहे. तेथून देवी फिरत फिरत दापोडीत आली आणि दापोडी गावची ग्रामदेवता झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते.
रंगरंगोटी अन् विद्युत रोषणाई
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराला रंगरंगोटी आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून भरगच्च धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवीची पारंपरिक पद्धतीने पूजा बांधण्यात आली. नऊ दिवस विविध रूपांत देवीची पूजा बांधली जाते. दरवर्षी प्रमाणे प्रथेनुसार शेवटच्या दिवशी जागरण गोंधळ करण्यात येतो. नवरात्र उत्सवा दरम्यान परिसरातील मान्यवरांच्या हस्ते दररोज महाआरतीचा मान देऊन उत्सव साजरा करण्यात येतो. रोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. उत्सवानंतर प्रथेप्रमाणे पालखी छबिना मिरवणूक काढण्यात येते. याशिवाय, ग्रामस्थांच्यावतीने निकाली कुस्त्या, रोख पारितोषिकांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्र व देशभरात नाव लौकिक असणारे नामांकित मल्ल निकाली कुस्तीत भाग घेण्यासाठी येतात. बाळगोपाळांसाठी आनंद मेळा, मनोरंजनात्मक कार्यक्रम, लोकनाट्य तमाशा असे भरगच्च कार्यक्रम नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येतात.

देवीचा शिळारुपात वास
श्री फिरंगाई देवी हेमाडपंथी मंदिरात शिळारुपी वास करणारी देवीची मूर्ती आहे. पुरातन मंदिर असूनही हे गावकरी, भाविकांकडून मंदिराचे सुस्थितीत जतन करण्यात आले आहे. दापोडीकरांच्यावतीने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com