

जुनी सांगवी, ता. ३ ः शेतकऱ्यांचा घरातील एक सदस्य या नात्याने शेतकरी कुटुंब पशुधनावर प्रेम करतात, हे सर्वश्रुत आहे. पण, यापुढे जाऊन आता सणांचा ट्रेंडच बदलत चालला आहे. सध्या बैलगाडा शर्यतीची तरुणाईला असलेली भुरळ व पशुसंवर्धन व जतन करण्याची अनेकांना आवड आहे. गावगाड्यात प्रत्येक घरी काहीनाकाही पशुधन नियमित असायचे. गावे उपनगर विकासाच्या प्रवाहात येत असताना येथील शेती नामशेष झाली तसे पशुधन दुर्मिळ होत गेले. आता स्मार्ट सिटीत बैलपोळा मिरवणुका म्हटलं तरी कुतूहल वाटते.
जुनी सांगवीत शंभू ग्रुपकडून आकर्षक दिव्यांची विद्युत रोषणाईची आरास केलेल्या रथातून बैलांची डिजेच्या वाद्यात मिरवणूक काढली. ग्रुपच्या रूपेश पुजारी, प्रतीक ढोरे, स्वप्नील शिंदे यांनी सजवलेल्या रथातून बैलांची मिरवणूक काढण्यात आली. याचबरोबर रुद्र ग्रुप चंद्रमणी नगर, पाखऱ्या ग्रुप आनंद नगर यांनी डिजेच्या वाद्यात मिरवणुका काढल्या. शहरात प्रथमच सजवलेल्या रथातून बैलांची मिरवणूक काढण्यात आल्याने ही मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.