दसरा, दिवाळीत होणार घराचे स्वप्न साकार

दसरा, दिवाळीत होणार घराचे स्वप्न साकार

Published on

पिंपरी, ता. ५ : ‘‘नव्याने विकसित होणाऱ्या ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे या भागातील रस्ते सुसज्ज होण्यासाठी आठ दहा दिवसांमध्ये वर्क ऑर्डर देणार आहोत. जे उर्वरित रस्ते आहेत त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून पुढील वर्षी काम हाती घेतले जाणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या पाहता २०४१ ची गरज ओळखून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे,’’ असे प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी ताथवडे येथे शनिवारी (ता. ५) केले.
‘सकाळ माध्यम समूहाच्या’ वतीने ताथवडेतील ‘सिल्वर बॅक्वेट हॉल’ येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘सकाळ वास्तू एक्स्पो’चे उद्‍घाटन प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. उद्‍घाटनप्रसंगी श्री सोनिगरा ज्वेलर्सचे संचालक जितेंद्र सोनिगरा, पुनामिया प्रॉपर्टीजचे संचालक यश जैन, ऐश्वर्यम् ग्रुपच्या असोसिट डायरेक्टर नम्रता बन्सल, ऑक्टोपस आर्मस् होम्स सोल्यूशनचे संचालक श्रीकांत सोमवंशी, एव्हरनेस्ट ग्रुपचे संचालक दत्तात्रेय येवले, सुमीत शर्मा, नरसिंग गाढवे, माहेश्वरी रिअॅलिटीजचे संचालक प्रशांत ब्राम्हणकर, उदय कन्स्ट्रक्शनचे बाळासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक चेतन भुजबळ, सिव्हर बँक्वेट हॉलचे संचालक अनिकेत पवार, परमानंद जमतानी उपस्थित होते.
नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळीच्या मुहूर्तावर नागरिकांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ वास्तू एक्स्पो’हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त ठरत आहे. शहरातील दर्जेदार गृहप्रकल्पांचे स्टॉल, गृहकर्जाविषयी माहिती हे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने पहिल्याच दिवशी नागरिकांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘विकसकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेचा प्रयत्नशील’
‘शहरातील पाणीपुरवठा, वीज, स्थापत्य हे विभाग माझ्याकडे आहेत. शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करीत आहोत. त्या अनुषंगाने जे भामा आसखेडसारखे काही उर्वरित प्रकल्प आहेत, ते डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल. पुढील पंचवीस वर्षांपर्यतचे पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिका करीत आहे. विकसकांना रस्ता पाणी यासारख्या भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महापालिका कार्यरत आहे.

या भागातील सर्व विकसकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी ‘सकाळ’ने राबविलेला ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ उपक्रम अतिशय उत्तम आहे. एकाच ठिकाणी या भागातील सर्व प्रोजेक्ट असल्याचा फायदा नागरिकांना निश्चित होईल.’’
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com