कुरिअरच्या डिलिव्हरीवरून
खून प्रकरणाचा उलगडा 
सांगवीतील खून प्रकरणी दोघांना अटक

कुरिअरच्या डिलिव्हरीवरून खून प्रकरणाचा उलगडा सांगवीतील खून प्रकरणी दोघांना अटक

Published on

पिंपरी, ता. ९ : जुन्या सांगवीतील जिल्हा रुग्णालयाजवळ डोक्यात दगड घालून झालेल्या तरुणाच्या खुनाचा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने २४ तासात उलगडा केला. आरोपीने दिलेल्या कुरिअरच्या डिलिव्हरीवरून तपास करीत पोलिसांनी त्यांना गजाआड केले. उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना वाशीम येथून अटक केली.
पप्पू ऊर्फ जितेंद्र त्रिपाठी (रा. अहोदा, जि. चित्रकूट, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. शिव मंगल सिंग (वय ३८), सोमदत्त मनमोहन दुबे (वय २२, दोघे रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्हा रुग्णालयाजवळ एकाचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. ८) सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी तपास करत असताना पप्पू त्रिपाठीसोबत दोघेजण दुचाकीवर जात असल्याचे पोलिसांना सीसीटीव्हीमध्‍ये दिसले. त्यातील एकाच्या हातामध्ये पांढऱ्या‍ रंगाची पार्सलची पिशवी होती. ते कोठे जात आहेत, याची माहिती घेतली. कृष्णा चौकातील कुरिअरच्या कंपनीमध्ये गेल्याचे निष्पन्न झाले. तिथे चौकशी केल्यानंतर, तो शिव सिंग असल्याचे समजले. त्याचे लोकेशन तपासले असता, दोघे आरोपी खासगी बसगाडीने उत्तरप्रदेश येथे जात असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. किरकोळ कारणावरून खून केल्याची कबुली त्यांनी दिली.

-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com