राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्यता
Published on: 

अशी झाली लढत - २०१९ : पिंपरी विधानसभा मतदारसंघ
..............


विद्यमान आमदार - अण्णा बनसोडे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ः ८६ हजार ९८५ मते ः १९ हजार ८०८ मताधिक्य


प्रदीप लोखंडे
पिंपरी, ता. १७ : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असलेला पिंपरी विधानसभा मतदारसंघ असून, मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असल्यामुळे अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गाचे वर्चस्व आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रभाव या भागात आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न असून, इच्छुकांची बंडखोरीची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या भागात असल्याने महाविकास आघाडीने तगडा उमेदवार दिल्यास लढत जोरदार होऊ शकते. तर; काही माजी नगरसेवकांचा विरोध असला तरी अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांचे सर्वच स्तरात असलेले जाळे व तळागाळातील कार्यकर्ते व नागरिकांशी असलेल्या संबंधामुळे त्यांच्या उमेदवारीचीच दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीत जागा कोणाला सुटते, यावर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अशी आहे स्थिती -

- विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता.
- आमदार बनसोडे यांना पक्षातील पदाधिकाऱ्यांचा आणि सिंधी समाजाच्‍या वाढत्‍या विरोधाचे आव्‍हान.
- महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्‍या भाजपच्‍या पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादीला नाराजी काढावी लागणार.
- महाविकास आघाडीत मतदारसंघ कोणाला सुटतो, यावर उमेदवारीची गणिते.
- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून सुलक्षणा शीलवंत, देवेंद्र तायडे, सीमा सावळे इच्‍छुक.
- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून सुलक्षणा शीलवंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता.
- सीमा सावळे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेही प्रयत्न; त्या अपक्षही लढण्याची शक्‍यता.
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाही मतदारसंघावर दावा.
- माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्‍वार, सचिन भोसले इच्‍छुक.
- आरपीआय आठवले गटाला जागा न मिळाल्‍यास नाराजीची शक्‍यता.
- झोपडपट्टीचा बहुतांश भाग असल्‍याने वंचित बहुजन आघाडीला मोठा पाठिंबा मिळण्याची शक्‍यता.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या शिवसेनेचाही मतदारसंघावर दावा.
- शिवसेनेत असलेले माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांचेही राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे प्रयत्न.

निवडणुकीचे मुद्दे -
- मतदारसंघातील झोपडपट्ट्याचे पुनर्वसन करणे.
- मतदारसंघातील झोपडपट्ट्यांमध्ये मूलभूत नागरी सुविधा योग्यरीत्या पुरवणे.
- मतदारसंघात कंपन्यांची संख्या कमी होत असल्याने वाढत्या रोजगारीचा प्रश्‍न.
- मतदारसंघात नियमित व पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करणे.

फोटो ः 56267

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.