हक्काबरोबरच कर्तव्याची जाण हवी

हक्काबरोबरच कर्तव्याची जाण हवी

Published on

पिंपरी, ता. १७ : ‘‘ हक्काची अंमलबजावणी करताना स्वतःच्या कर्तव्याची जाण असणे आवश्यक आहे.’’ असे मत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी व्यक्त केले. तसेच विविध उदाहरणांच्या माध्यमातून कुटुंबातील संवाद खूप महत्त्वाचा मोलाचा असल्याचा कानमंत्र त्यांनी दिला.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त थेरगावमधील खिंवसरा-पाटील विद्या मंदिर येथे संविधान साक्षरता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. दर्द से हमदर्द तक ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषद, विधी प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री ॲड. सतीश गोरडे, मुख्याध्यापक नटराज जगताप, ॲड. सोहम यादव, ॲड. संकेत राव, ॲड. ऋषीकेश शर्मा, ॲड. महेश सोनवणे, ॲड. राजेश्वरी रणपिसे, ॲड. प्रतीक साखळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वतंत्र राज्यांना भारताच्या एकसंघ करण्याचा प्रयत्न संविधानाने केला. याच संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने १६ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये संविधान साक्षरता सप्ताह आयोजित करण्यात येणार असल्याचे ॲड. राव यांनी नमूद केले.

संविधान साक्षर करणार...
ॲड. सतीश गोरडे यांनी हा उपक्रम दहा विधी महाविद्यालय आणि इतर ठिकाणी घेण्यात येणार असून पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांना या उपक्रमातून संविधान साक्षर करणार असल्याचे सांगितले. तसेच मतदारांनी १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले. नटराज जगताप यांनी आभार मानले. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com