सुरेखा कटारिया यांना 
अमर साहित्य सेवा पुरस्कार

सुरेखा कटारिया यांना अमर साहित्य सेवा पुरस्कार

Published on

पिंपरी, ता. १७ ः ज्येष्ठ साहित्यिका व भारतीय जैन संघटनेच्या उपप्राचार्य सुरेखा कटारिया यांना साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय लेखनाबद्दल गुरू अमर साहित्य सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. बंगळूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ऑल इंडिया कटारिया फाउंडेशनचे कर्नाटक अध्यक्ष मिश्रीलाल कटारिया संघवी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुरेखा कटारिया यांनी आतापर्यंत यशस्वीरीत्या पंधरा अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलने भरविली आहेत. त्यांनी लिहिलेल्या प्रवचन कला साधना तसेच, आविष्कार हे पुस्तक अखिल भारतीय स्वाध्याय संघातील साधकांसाठी हे पुस्तक अभ्यासासाठी निवडले गेले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अमरमुनी साहित्य सेवा पुरस्कार वितरण करताना समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉ. अशोक बोरा यांना वैद्यकीय सेवेबद्दल अमर वैद्यकीय सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कीर्तनकार डॉ. श्वेता राठोड यांनी सूत्रसंचालन केले. संघाचे अध्यक्ष प्रकाश चानोदिया यांनी प्रस्ताविक केले. महामंत्री नेमीचंद दलाल यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com