व्यापारी वर्गाच्या समस्यांचे निवारण करणार ः बनसोडे सिंधी बांधव व व्यापाऱ्यांनी दिला पाठिंबा
पिंपरी, ता. १७ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधी बांधवांसाठी व व्यापारी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध होतो. आजही आहे आणि उद्याही राहील, अशी ग्वाही पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली.
पिंपरीत आयोजित पत्रकार परिषदेत आमदार उमा खापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व महायुतीचे समन्वयक योगेश बहल, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, आरपीआय आठवले गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष कुणाल वावळकर, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, ज्येष्ठ उद्योजक व पिंपरी चिंचवड व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी, माजी नगरसेवक तुषार हिंगे, जगन्नाथ साबळे, हरेश बोधानी, प्रसाद शेट्टी, शीतल शिंदे, शैलेश मोरे, जगदीश शेट्टी, रोहित काटे, तसेच पिंपरी कॅम्प मधील व्यापारी किशोर केशवानी, लच्छू बुलानी, जयेश चौधरी, गोपाळ खत्री आदी उपस्थित होते.
योगेश बहल म्हणाले, ‘‘अण्णा बनसोडे हे लोकांच्या अडचणीला धावून जातात. त्यामुळेच मागील वेळी पिंपरी कॅम्पमधील व्यापाऱ्यांनी आग्रह करून अजित पवार यांच्याकडे त्यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला होता.’’
पिंपरी कॅम्पातील व्यापारी वर्गामध्ये वाहतूक कोंडी, पार्किंग सुविधा नसणे यावरून काहीशी नाराजी होती. मात्र, या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाचे समाधान झाले असल्याचे माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

