जागतिक शौचालय दिनानिमित्त 
आरोग्य विभागाकडून जनजागृती

जागतिक शौचालय दिनानिमित्त आरोग्य विभागाकडून जनजागृती

Published on

जुनी सांगवी, ता. १९ ः पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग व बेसिक्स संस्था यांच्या वतीने जागतिक शौचालय दिनानिमित्त परिसर स्वच्छतेबाबत ‘ह’ प्रभागांतील प्रभाग क्र. ३१ नवी सांगवी, प्रभाग क्र. ३२ जुनी सांगवी येथे नागरिकांना प्रबोधन करून विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
परिसर स्वच्छता, अस्वच्छतेमुळे पसरणारे आजार याबाबत प्रबोधन करण्यात आले. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी कचरा उघड्यावर न टाकता कचरा गाडीतच कचरा देण्यात यावा. ओला, सुका कचरा अलगीकरण करून तो स्वच्छता दुतांकडे द्यावा. सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ ठेवावीत. परिसर स्वच्छतेसाठी कचरा उघड्यावर न टाकता कचरा संकलन गाडी, घंटागाडी, कचरा संकलन केंद्रावर देवून स्वच्छता कामात कर्मचाऱ्यांना व आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे, आरोग्य सहाय्यक रामचंद्र शिंगाडे, आरोग्य मुकादम अरुण जगताप, नारायण शितोळे, बेसिक्स संस्थेचे सुनील धावारे, अमन बिऱ्हाडे व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com