दिघीतील मातृछाया बालकाश्रमात स्नेहभोजन
पिंपरी, ता. ७ : मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्था यांच्या वतीने दिघीतील मातृछाया बालकाश्रमात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी ३५ मुलांना स्नेहभोजन देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी अण्णा जोगदंड म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी जगाला दिलेला संदेश विसरून चालणार नाही. या महामानवाने अत्यंत गरीब व वंचित घटकासाठी आयुष्य समर्पित केले. प्रत्येक महापुरुषाने सर्वधर्म समभाव या विचाराने समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी काम केले आहे.
याप्रसंगी संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र महिलाध्यक्षा संगीता जोगदंड, शहर उपाध्यक्ष विकास शहाणे, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, सचिव गजानन धाराशिवकर, खेडचे अध्यक्ष शंकर नाणेकर सा.का. प्रकाश वीर, संस्थापक आनंद गोटे, कैलास वीर, ऋषिकेश काळे, सागर थिटे, तनया वीर, वैष्णवी मुळे उपस्थित होते.
दिघी : मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने मातृछाया बालकाश्रमातील अनाथ, निराधार मुलांना स्नेहभोजन देताना पदाधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

