दापोडीकरांनी जपली दिडशे वर्षांची परंपरा
जुनी सांगवी, ता. ११ ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन काळात पूर्वीची दर्पपुडीका नाव असलेल्या आजच्या दापोडी गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याबरोबरच फिरंगाई देवीचे या भागात ऐतिहासिक महत्त्व आहे.
दापोडीचे ग्रामदैवत व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली श्री फिरंगाई देवीची चांदीची पालखी करण्यात येत आहे. श्री फिरंगाई देवी हेमांडपंथी मंदिरात शिळारूपी वास करणारी देवीची मूर्ती आहे. पंचक्रोशीत इच्छापूर्ती करणारी देवी असल्याची ख्याती आहे.
कुरकुंभ हे देवीचे मूळ स्थान आहे. हीच देवी फिरत फिरत दापोडीत आली आणि दापोडी गावची ग्रामदेवता झाली, अशी आख्यायिका आहे. येथील पालखी उत्सवाला ऐतिहासिक दिडशे वर्षांची परंपरा आहे. इंग्रजी सत्ता काळात गुणवंत धोंडीबा घुले जस्टिस म्हणून काम करत होते. इंग्रजांच्या काळात या मंदिराची देखभाल त्यांच्याकडे होती. पुढे समस्त दापोडीकरांनी एकत्र येत पालखी परंपरा आजवर जपली आहे. पूर्वीपासून यात्रा उत्सव, लोकनाट्य, निकाली कुस्त्यांचे आयोजन आजवर दापोडीकरांनी जपली आहे. पंधरा किलो चांदीपासून फिरंगाई देवीच्या पालखीचे काम साकारण्यात येत आहे. यानिमित्त श्री फिरंगाई देवी उत्सव समितीच्यावतीने सोमवारी (ता. १६) चांदीच्या पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. फिरंगाई देवी मंदिर ते मारूती मंदिर, दापोडी गावठाण मारुती मंदिर पटांगणात समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाने पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.
पूर्वीपासून घुले, काटे, बोधे, मोरे, शेळके, भाडाळे, कांची, बाराथे, शेळके आदी दापोडी कर समस्त ग्रामस्थांच्यावतीने पालखी उत्सवाला सहभाग परंपरा राहिली आहे. तर गावचे पोलिस पाटील जयाजी पाटलोजी काटे यांच्या घरी देवीच्या पादुका व मुखवटा ठेवण्यात यायच्या पादुका व मुखवट्याचा मान जयाजी पाटलोजी काटे कुटुंबाकडे आहे.
मूर्तिकार कलाकार सागर खर्डेकर हे पालखी तयार करण्यासाठी पालखीवर शेवटचा हात फिरवत आहेत. उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश ज्ञानोबा काटे, उपाध्यक्ष रितेश सुरेश काटे, खजिनदार राजेश तानाजी काटे, सेक्रेटरी संजय सुभाष गाडुते, उत्सव प्रमुख शिवाजी एकनाथ काटे उत्सव प्रमुख म्हणून योगदान करत आहेत. समस्त दापोडी ग्रामस्थ पंचक्रोशीतील भाविकांच्या योगदानातून चांदीची पालखी करण्यात आल्याचे उत्सव समितीकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

