जुनी सांगवीतील नद्यांच्या काठी डासांचा प्रादुर्भाव
जुनी सांगवी, ता. ४ ः पवना व मुळा या दोन्ही नद्यांच्या कुशीत असलेल्या जुनी सांगवीकरांना गेल्या अनेक वर्षांपासून डासांच्या प्रादुर्भावाचा त्रास सहन करावा लागत आहे. नद्यांमधील जलपर्णी व नदी काठावरील अस्वच्छता यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पात्रातील जलपर्णी हटविण्याचे काम सुरू असले तरी डासांचा त्रास कायम असल्याने सांगवीत मच्छरदाणी व इतर डास प्रतिबंधक इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मागणी वाढली आहे.
उकाडा वाढल्याने आणि डासांच्या चाव्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. रात्री एका जागी थांबणेही असह्य होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. भाजी मंडई, उद्याने, सोसायट्या, बाजारपेठेत दुकानांमधून डासांपासून संरक्षणासाठी अगरबत्ती, धूप यांचा वापर करताना व्यापारी व विक्रेते करताना दिसत आहेत.
जलपर्णीमुळे वाढला डासांचा प्रादुर्भाव
जलपर्णीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नियमित नदी स्वच्छता कामे न केल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नियमित स्वच्छता करून पुढील उन्हाळा सुकर करावा, नियमित धुरीकरण, सार्वजनिक ठिकाणे, अडगळीची ठिकाणे, मोकळे मैदान, उद्यान परिसराची स्वच्छता व धुरीकरण करावे अशी मागणी होत आहे.
‘नेहमीच येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे प्रशासन व पर्यावरण विभाग याकडे काणाडोळा कर आहे. जलपर्णीची वाढ झाल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.’’
- एक नागरिक
‘‘सांगवी परिसरात नागरिकांच्या मागणीनुसार नियमित धुरीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर जलपर्णी हटविण्याचे काम सुरू आहे.’’
- दीपक कोटियाना, आरोग्य निरीक्षक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

