

जुनी सांगवी, ता.४ ः जुनी सांगवीचे ग्रामदैवत श्री वेताळ महाराज उत्सवाची तयारी समस्त सांगवीकरांच्यावतीने करण्यात येत आहे. त्याच्या नियोजनाबाबतची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत समस्त सांगवीकर ग्रामस्थांच्यावतीने उत्सव कार्यकारणीचे अध्यक्ष म्हणून कुमार ढोरे तर कार्याध्यक्ष म्हणून दिलीप तनपुरे यांची निवड करण्यात आली. याशिवाय कार्यकारिणीचे इतर पदाधिकारीही जाहीर करण्यात आले.
पवना नदीकाठावर असलेल्या वडाच्या झाडाखाली ग्रामदैवत श्री वेताळ महाराज यांचे जागृत देवस्थान आहे. काही वर्षांपूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन महापालिकेच्यावतीने येथील वेताळ महाराज देवस्थान परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. दरवर्षी श्री वेताळ महाराज उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याच्या नियोजनाच्यादृष्टीने ग्रामदैवत श्री वेताळ महाराज देवस्थानचे अध्यक्ष युवराज ढोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत समस्त सांगवीकर ग्रामस्थांची बैठक झाली. त्या बैठकीत उत्सव कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी रमेश ढोरे, खजिनदारपदी अशोक ढोरे, सहखजिनदार आदित्य ढोरे, सहकार्याध्यक्ष गणेश ढोरे, वर्गणीप्रमुखपदी राजेंद्र शितोळे, अतुल पोंगडे, शिवाजी ढोरे यांची तर सप्ताह नियोजनासाठी प्रसाद ढोरे, गौरव ढोरे, ऋषिकेश ढोरे, अक्षय रामकृष्ण ढोरे (सप्ताह नियोजन) निवड करण्यात आली.
या उत्सवासाठी स्वागत कमान उभारण्यात आली असून विद्युत रोषणाई केली जात आहे. उत्सवात काठी मिरवणूक, श्रीराम पालखी मिरवणूक काढण्यात येते. शंभर किलो खिचडी व काल्याचा महाप्रसाद भाविकांसाठी करण्यात येतो. या उत्सवाला ग्रामस्थांकडून सप्ताहाचे स्वरूप देण्यात आले आहे.
युवराज ढोरे म्हणाले, सकाळी कलश पूजनाने उत्सवाची सुरुवात होते. देवाला पोशाख, फेटा असा पेहराव अर्पण केला जातो. अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण सारखे धार्मिक कार्यक्रम होतात. सप्ताह काळात नामवंत कीर्तनकार सप्ताहात कीर्तन सेवा देत असतात.’’
जागता पहारा अन् काठीचा मान...
सप्ताहानिमित विणेकरी दहा दिवस जागता पहाऱ्याची सेवा करतात. ग्राम उपाध्याय श्री इनामदार गुरूजी यांच्या हस्ते मंगल शांती यज्ञ केला जातो. नितीन नवगुणे, नामदेव कावरे हे पुजारी म्हणून सेवा देतात. मानकरी जयनाथ ढोरे, दत्ता माकर यांना काठीचा मान देण्यात आलेला आहे. सेवेकरी मान शरद मधुकर ढोरे यांच्याकडे आहे; तर इच्छेनुसार समस्त सांगवीकरांना काठीचा मान वेगवेगळा देण्यात येत असतो.
PIM25B19356
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.