

जुनी सांगवी, ता. ४ ः येथील प्रभाग क्र. ३२ मध्ये घरोघरच्या कचरा संकलनासाठी घंटागाड्या अपुऱ्या पडत आहेत. परिणामी, कचरा तुंबल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांची कसरत होत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत महापालिका आरोग्य विभागाकडून घरोघरचा कचरा संकलनासाठी गाड्यांची संख्या वाढवावी, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
सध्या आठ गाड्यांद्वारे कचरा संकलन करण्यात येतो. यात अनेकदा तीन गाड्या नादुरुस्त असतात. लोकसंख्येच्या तुलनेत आठ गाड्यांवर कचरा संकलनाचा ताण येतो. यातच नादुरुस्त गाड्यांमुळे घरोघरचा कचरा तुंबला जात असल्याने हा कचरा रस्त्यावर येतोय. कचराकुंडी मुक्त प्रभाग संकल्पना राबवताना घरोघरच्या कचरा संकलनासाठी मुबलक स्वरूपात उपाययोजना केली गेली नसल्याने याचा परिणाम ये रे माझ्या मागल्या, अशी स्थिती झाली असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. याचा आरोग्य कर्मचारी वर्गावरही ताण येत असून, रस्त्याकडेला पडणारा कचरा आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमित उचलावा लागत असल्याने कचराकुंडीमुक्त प्रभाग संकल्पनेचा बोजवारा उडाला आहे.
‘‘कचरा संकलनासाठी लागणाऱ्या गाड्यांची संख्या अपुरी आहे. एका गल्लीत एक गाडी भरते. यातच भाजी मंडईचा कचरा, हॉटेल व्यावसायिकांचा कचरा यांची भर पडते. सांगवीची लोकसंख्या पाहता येथे दुपटीने गाड्यांची आवश्यकता आहे.
- प्रा. गणेश चव्हाण, नागरिक
‘‘परिसर स्वच्छतेसाठी यंत्रणा तोकडी पडत आहे. कचराकुंडीमुक्त प्रभाग संकल्पना चांगली आहे. तितकीच सक्षम यंत्रणा हवी.
- गणेश ढोरे, अध्यक्ष, मधुबन मित्र मंडळ
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.