...अन् उलगडला पिंपरी चिंचवड शहराचा प्रवास
पिंपरी, ता. १० : धार्मिक आणि ऐतिहासिक संस्कृतीची पार्श्वभूमी असलेल्या या उद्योगनगरीतील नागरिक आता, हे माझं शहर असल्याचा अभिमान व्यक्त करतात यामुळे ऊर भरून येतो, अशी भावना पिंपरी चिंचवडचे पहिले महापौर ज्ञानेश्वर लांडगे यांनी येथे व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड शहर निर्मितीच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त अंशुल प्रकाशनने सायन्स पार्क येथे कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पहिले नगरसेवक मधु जोशी, सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे तसेच १९७० मध्ये सरपंच असलेल्या तुळशीराम काळभोर, अनंतराव गावडे, यांच्यासह लांडगे, वाघेरे, भिसे, बारणे, काटे या घराण्यांचे सर्व कुटुंबिय या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीच्या प्रवासावर आधारित नाटकाचा प्रयोग, लेखक विजय जगताप यांनी शहराच्या इतिहासावर लिहिलेल्या ग्रंथातील, हे शहर कसे बनले व येथील भूमिपुत्रांचे योगदान या लेखांचे अभिवाचन, लेखक जगताप यांची प्रकट मुलाखत आदी कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
आपण भोसरीचे सरपंच कसे झालो आणि या शहराला जन्म देण्यासाठी अण्णासाहेब मगर यांनी आम्हा चार गावच्या सरपंचांना कसे प्रवृत्त केले हा सगळा प्रवास लांडगे यांनी आपल्या भाषणात उलगडून सांगितला.
निवेदक विजय बोत्रे पाटील व संदीप साकोरे यांनी लेखांचे अभिवाचन केले. नाट्य प्रयोगामुळे त्या काळातील घटनांचे सर्वांना स्मरण झाले. जगताप यांनी आपल्या मुलाखतीत शहर निर्मितीचा पट उलगडून सांगितला. प्रा. माया मुळे यांनी प्रास्तविक, गोरख गायकवाड यांनी सूत्रसंचालन, तर संभाजी बारणे यांनी आभार मानले.
PNE25U96666
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

