हास्याचा खळखळाट अन् त्याला नृत्याची साथ!

हास्याचा खळखळाट अन् त्याला नृत्याची साथ!

Published on

जुनी सांगवी, ता. १४ : रणरणत्या उन्हात थंडगार फालुदा अन् चटपटीत हटके लोणच्याची चव चाखत...व्हेज पांढरा रस्सा अन् चमचमीत राइसचा दरवळ अनुभवत... खळखळून हसत, अंतर्बाह्य सुंदर दिसण्याच्या टिप्स मनात साठवत, गाणी गात, नाचत धम्माल करत महिलांनी ‘वूमन वेनस्डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला.

तनिष्का व्यासपीठ, सकाळ आणि स्मार्ट बझारच्या वतीने महिला दिनानिमित्त ‘वूमन वेनस्डे’ या उपक्रमांतर्गत शहरात विविध ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उपनगरातील वाकड, पिंपळे सौदागर, मोशी, पिंपळे गुरव यासह राज्यातील सर्वच स्मार्ट बझारच्या दालनांमध्ये मोठ्या उत्साहात महिलांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला.
वाकड येथे सौंदर्य तज्ज्ञ कुहू खांडेकर यांनी महिलांना ब्युटी टिप्स दिल्या, झटपट व योग्य मेकअप कसा करावा त्वचेची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. पिंपळे सौदागर येथे शेफ वंदना काळे यांनी रणरणत्या उन्हात घरच्याघरी मुलांना आवडेल अशी आरोग्यदायी थंडाई, मफ्फीन, व्हेज क्रिस्पीज आणि चवदार पदार्थ कसे बनवायचे यांचे धडे महिलांना दिले.
शेफ केतकी पाटील यांनी कोल्हापूर, सातारचा बाज असलेला व्हेज तांबडा पांढरा रस्सा, क्रिस्पी फलाफल प्रात्यक्षिकातून महिलांना दाखवून दिले. मोशी येथे सौंदर्य तज्ज्ञ सीमा बढे यांनी सुंदर दिसण्यासाठी मेकअप मॅजिकचा कसा प्रयोग करावा, याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. संयोजन रमेश मोरे, लक्ष्मी गालफाडे, सारिका तुळवे, रंजना मोरे, आरजू मुलाणी, राधिका घोडके यांनी केले.


महिलांना केंद्रस्थानी ठेऊन ‘वूमन्स वेनस्डे’ या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. महिलांनी एकत्र येत कार्यक्रमांच्या माध्धायमातून स्वतःची करमणूक घ्यावी, तसेच खरेदीचाही आनंद लुटावा, हा त्यामागील उद्देश आहे.
- प्रवक्ता, स्मार्ट बझार

तनिष्का व्यासपीठाचे सर्वच उपक्रम महिलांसाठी उपयुक्त तितकेच छान असतात.''वूमन्स वेनस्डे'' या कार्यक्रमात खुप शिकता आले. धमाल करता आली.
- भाग्यश्री पात्रे, गटप्रमुख, वाकड.

महिलांसाठी आजच्या धावपळीच्या जगात नवनवीन शिकण्यासाठी तनिष्का व्यासपीठ सर्वोत्तम आहे. वुमेन्स वेनस्डे हा उपक्रम असाच पुढे सुरू ठेवावा.
- सीमा साठे, गटप्रमुख
वाकड : स्मार्ट बाजार येथे तनिष्का व्यासपीठ व स्मार्ट बाजार आयोजित ‘वूमेन्स वेनस्डे’, उपक्रमात सहभागी महिला.

फोटो :
PIM25B19393
लोगो = PIM25B19397,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com