

जुनी सांगवी, ता. ३० : भक्तिसोबत शक्ती व एकात्मतेचा संकल्प करून पिंपरी चिंचवड शहराच्या ‘सकाळ’ तनिष्का व्यासपीठाच्या वतीने तनिष्का व्यासपीठाचा १२ वा वर्धापनदिन जुनी सांगवी येथील संत सावता माळी उद्यानात उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉक्टर वकील, महिला पोलिस अधिकारी, महिला भजनी मंडळ ग्रुप यांच्या सोबतीला पारंपरिक पेहरावात तनिष्का सदस्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होत्या.
राज्यभरात ‘भक्ती, शक्ती आणि एकात्मते’च्या गुढ्या ठिकठिकाणी उभारून ‘तनिष्का व्यासपीठा’चा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या गुढीपाडव्याला ‘तनिष्का’ने १३ व्या वर्षात पदार्पण केले. महिलांनी स्वतःमध्ये बदल घडवून क्षमता, कौशल्यांचा विकास साधत समाजामध्ये सकारात्मक पद्धतीने परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने व्यासपीठाची स्थापना करण्यात आली होती. या काळात तनिष्का सदस्यांनी स्वतःची नवीन ओळख निर्माण करण्यासोबतच सामाजिक समस्या सोडविण्यापासून ते आरोग्य, पर्यावरण, आर्थिक स्वावलंबन यासारख्या विविध विषयांवर मोठे कार्य उभे केले आहे.
सध्याच्या बदलेल्या समाजात आपली संस्कृती, परंपरा पुन्हा एकदा रुजावी आणि समाजातील सलोखा वाढीस लागून सकारात्मक बदल घडविण्यासाठी यंदा जुनी सांगवी येथे ‘भक्ती, शक्ती आणि एकात्मते’ची गुढी उभारण्यात आली. यावेळी तनिष्का व्यासपीठ महिला डॉक्टर फोरमच्या विभाग समन्वयक डॉ. रितू लोखंडे, डॉ.धनश्री बोरगावे, डॉ. सुचिता गायकवाड महिला पोलिस कर्मचारी पूनम चव्हाण, निता राऊत, ॲड. मनीषा आल्हाट, तनिष्का गट प्रमुख उज्ज्वला ढोरे, रेश्मा शिंदे, सुनंदा कोळी, कविता जाधव, सुवर्णा कठाळे, अंजना पाटील, कमल शिंदे, सुनीता देवी, ममता देवी, यादव मालू रानवडे, माधुरी पवार, गंगुबाई जानडे आदी ‘तनिष्का’ सदस्य यावेळी उपस्थित होत्या.
गुढी उभारल्यावर उपस्थितांनी महिला सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणाची जपणूक यावर आधारित विशेष संकल्प घेत, या विषयावर समाजासाठी भरीव योगदान देण्याचे ठरवले. जिल्हा समन्वयक रमेश मोरे यांनी तनिष्का व्यासपीठाच्या उपक्रमांची माहिती दिली. राधिका घोडके, रंजना मोरे आदींनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.