बाइक टॅक्सीविरोधात रिक्षा पंचायतीची निदर्शने

बाइक टॅक्सीविरोधात रिक्षा पंचायतीची निदर्शने
Published on

पिंपरी, ता. १० : ‘‘बाइक टॅक्सीला पिंपरी चिंचवड परिसरात परवानगी देऊ नये. खुला रिक्षा परवाना बंद करावा, या मागण्या मांडत रिक्षा पंचायत संघटनेने बुधवारी (ता.१०) पिंपरी चिंचवड अपर तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने केली. यानंतर अपर तहसीलदार जयराज देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी हिरालाल लांडगे, काशिनाथ शेलार, अशोक मिरगे यांनी रिक्षाचालकांना आंदोलनाची माहिती दिली. ‘‘येत्या काळात रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव व सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यासाठी आम्ही तयार आहोत,’’ अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. आंदोलनासाठी संजय जाधव, महादेव टोणपे, विशाल खराडे, परशुराम बंदपट्टे, संतोष खराडे, शंकर शेरखाने, अशोक कांबळे यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com