जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर मोबदला

जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर मोबदला
Published on

पिंपरी, ता. ११ : विविध विकासकामांसाठी जमिनी घेतलेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) शेतकऱ्यांकडून संपादित केलेल्या जमिनीच्या परताव्याबाबत ६.२५ टक्के जमीन आणि दोन चटई निर्देशांक (एफएसआय) देण्याबाबत निर्णय झाला. मात्र, किचकट प्रक्रियेने त्याचा लाभ मिळत नव्हता. अखेर दहा शेतकऱ्यांना वरील निर्णयानुसार परतावा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची कागदपत्रे आणि अन्य त्रुटींची तपासणी सुरू आहे.

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अस्तित्वात असताना १९७२ ते १९८४ या दरम्यान जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या परताव्याबाबत विषयावर मार्ग निघत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. संपादित झालेल्या शेतकऱ्यांना ६.२५ टक्के जमीन आणि दोन चटई क्षेत्र एवढा निर्देशांक देण्याची घोषणा शासनाने केली. त्यानंतर सध्याच्या ‘पीएमआरडीए’कडून याबाबत प्रत्यक्षात कार्यवाही सुरू झाली.

या प्रक्रियेसाठी लागणारा भूसंपादन दाखला लवकर मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठपुरावा देखील ‘पीएमआरडीए’ने केला. तसेच, प्राधिकरणातील काही मनुष्यबळ तेथे देण्यात आले होते. कागदपत्रांची संख्या कमी करून केवळ भूसंपादन दाखला, वारस नोंदणी, जागेसंबंधीधित फेरफार उतारा या प्रमुख कागदपत्रांची मागणी केली. दरम्यान, परताव्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आता त्यातील दहा प्रकरणांतील शेतकऱ्यांना परतावा मिळण्याबाबत अंतिम प्रक्रिया सुरू आहे.

वेगवेगळ्या प्रकरणांनुसार संपादित जमिनींच्या मोबदल्याची प्रक्रिया सुरू आहेत. त्यापैकी सात जणांचा (लीज ॲग्रिमेंट) करार झालेला आहे. अन्य चार अर्जदारांची मंजुरी मिळाली आहे. आणखी दहा अर्जांवर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे टप्प्याटप्पाने सर्वच प्रक्रिया देखील पूर्ण होईल.
- हिंमत खराडे, उपायुक्त, जमीन व मालमत्ता विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com