पिंपळे निलख भैरवनाथ यात्रा बगाड उत्सव- अखंड हरिनाम सप्ताह, हनुमान जयंती उत्साहात -

पिंपळे निलख भैरवनाथ यात्रा बगाड उत्सव- अखंड हरिनाम सप्ताह, हनुमान जयंती उत्साहात -

Published on

जुनी सांगवी, ता.१३ ः पिंपळे निलख येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त ‘भैरवनाथाच्या नावानं चांगभलं’ चा जयघोष करत शनिवारी (ता.१२) मुख्य यात्रेला सुरुवात झाली. मोठ्या भक्तिभावाने आणि हर्षोल्हासात संध्याकाळी सात वाजता ग्रामस्थांनी बगाड मिरवणूक काढली. या गावजत्रेचा सोमवारी (ता.१४) लाल मातींच्या निकाली कुस्त्यांच्या आखाड्याने समारोप होईल.
भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त पिंपळे निलख येथे ४ ते १० एप्रिलपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विनोद महाराज रोकडे, चंद्रकांत महाराज खळेकर, गणेश महाराज पुलकुंठवार, समाज प्रबोधनकार संग्राम बापू भंडारे, नवनाथ महाराज गोगावले, कबीर महाराज अत्तार, सोपान महाराज सानप यांची कीर्तन सेवा झाली. महाप्रसाद पंगतीही झाल्या. त्यानंतर शनिवारी गावच्या मुख्य यात्रेला सुरुवात झाली. सुमारे ६० ते ७० वर्षांपूर्वीच्या बगाडाची मिरवणूक हे यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य असते. त्याची तयारी दोन दिवस अगोदरपासूनच सुरू झाली होती. मंदिरासमोरच त्याची सजावट करण्यात आली.
शनिवारी (ता.१२) पहाटे ‘श्रीं’चा अभिषेक, सकाळी भजन, हनुमान जन्मोत्सव आणि संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास भैरवनाथ मंदिरापासून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली. सुमारे दहा फूट उंचीचे बगाड बैलगाडीवरच उभे केले जाते. बगाडचे साठे पाटील, इंगवले पाटील, चौधे पाटील यांच्यासह समस्त गावकरी हे मानकरी असतात. बापुजीबुवा मंदिर मार्गे खंडोबा मंदिरापर्यंत ही मिरवणूक नेण्यात आली. समस्त ग्रामस्थांसह असंख्य भाविक मिरवणुकीत सहभागी झाले. ही मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनीही गर्दी केली होती. सायंकाळी ‘श्रीं’ची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात्रेनिमित्त भैरवनाथ मंदिरची रंगरंगोटी करुन त्यावर फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली. याशिवाय गणपती मंदिर, दत्त मंदिर, खंडोबा मंदिरांचीही सजावट करण्यात आली. रविवारी सायंकाळी मनोरंजनात्मक कार्यक्रम झाला. सोमवार (ता.१४) कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त पिंपळे निलख ग्रामस्थांच्यावतीने उत्सव साजरा करण्यात येतो.

PNE25V06066, PNE25V06067

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com