जुनी सांगवीत पक्ष्यांसाठी चारा पाण्याची सोय
रमेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
जुनी सांगवी, ता.१५ ः तापमान वाढीमुळे उष्माघात व चारा पाण्याची उपलब्धता होत नसल्याने पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन जुनी सांगवी येथील पक्षीमित्रांकडून पवना नदीकाठ, मुळा नदीकाठ परिसर व रस्त्याकडेला असणाऱ्या झाडांवर भांड्यांमधून चारा व पाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे पक्ष्यांचा उन्हाळा सुकर होण्यास मदत होणार आहे.
जुनी सांगवी परिसरात पूर्वी साधारणतः २०१५ च्या आसपास पाणवठा संकल्पना राबविण्यात आली होती. प्रत्येक चौकात आणि गल्ल्यांमध्ये पिण्याचे हौद बांधण्यात आले होते. त्यामध्ये मोकाट जनावरे आणि इतर पशुपक्षी आपली तहान भागवत असत. मात्र, काळाच्या ओघात विकास कामांमध्ये हे हौद नष्ट झाले. त्यानंतर, आता वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्था, पिंपरी-चिंचवड व जीवदया सेना ट्रस्ट यांच्यावतीने पक्षांसाठी तब्बल १०० भांड्यांमधून उन्हाळा संपेपर्यंत अन्न पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. झाडांवर खाद्यांची भांडी व झाडाखाली कायमस्वरूपी पाण्याची भांडी ठेवण्यात येत आहेत. यावेळी संस्थेच्यावतीने अदिती निकम, सुरेखा बडदे, सिद्धार्थ कुरणे, प्रमोद कांबळे, विनायक बडदे, प्रवीण पवार, अभिजीत वडपल्ली, आकाश जाधव, अनिकेत निर्मळ, जयवर्धन कांबळे, अंकिता भालचिम, पालवी बडदे, व्यंकटेश बडदे, सखू पवार, काव्या कुरणे, मयुरेश पवार, आदित्य पठारे, आकाश पवार, मीनू पवार यांनी या उपक्रमात योगदान केले.
सध्या तापमान वाढीमुळे दिवसेंदिवस मनुष्यासह इतर पशुपक्षी प्राण्यांवर याचा परिणाम जाणवू लागला आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या छतावर, गॅलरी आणि खिडकीत पक्ष्यांसाठी चारा पाण्याची सोय केल्यास हे पर्यावरणातील अन्नसाखळी घटकांतील जीवांसाठी ईश्वरी सत्कार्य ठरेल.
- आदिती निकम, सामाजिक कार्यकर्त्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

