

पिंपरी, ता. २६ : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी चौक ते स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा, कोहिनूर सोसायटी या रहदारीच्या ठिकाणी पिंपरी चौकापासून ते कमला क्रॉस इमारतीपर्यंत महापालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृहच नाही. या परिसरात कामानिमित्ताने येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी आधुनिक स्वच्छतागृहाची तातडीने उभारणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
महिलांची कुचंबणा
पिंपरी चौकात नागरिकांची मोठ्या संख्येने वर्दळ असते. मात्र, स्वच्छतागृहाअभावी नागरिकांची कुचंबणा होते. महापालिका प्रशासनाने पिंपरी चौकात महिला व पुरुषांना लघुशंकेसाठी स्वच्छतागृह उभारल्यास या समस्येचे निवारण होईल. महिला वर्गाची कुचंबणा होणार नाही. बकालपणा थांबेल, परिसरात दुर्गंधी येणार नाही. तरी तातडीने स्वच्छतागृह उभारण्याचे निर्देश द्यावे.
‘‘या परिसरात उघड्यावरच काहीजण लघुशंका करीत असतात. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी ये-जा करणाऱ्या महिलांना, रहिवाशांना, शाळेतील मुलींना आणि महिलांना खाली मान घालून चालावे लागते.’’
- सुनील कांबळे, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.