सुखाचा पत्ता केवळ संतांनी शोधला ः जगताप

सुखाचा पत्ता केवळ संतांनी 
शोधला ः जगताप
Published on

पिंपरी, ता. २६ : ‘‘जगाच्या अंतापर्यंत कोणाला सुख नको आहे, असे होणार नाही. सुखाचा खरा पत्ता संतांनी शोधला. देवाशिवाय सुख नाही,’’ असे प्रतिपादन कीर्तनकार प्रमोद महाराज जगताप यांनी केले.
प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या द्विदशकपूर्ती वर्षानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. शाळेचे संस्थापक सचिव यादवेंद्र जोशी, विश्वस्त यशवंत लिमये, प्राचार्य शालन कासरे, चिखली शाळेच्या प्राचार्या अपर्णा गोवंडे, ज्ञानेश्वर म्हेत्रे तसेच वारकरी सांप्रदायिक, पालक, व शिक्षक आणि पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
जगताप म्हणाले, ‘‘सध्या नास्तिकता वादाने डोके वर काढले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या विश्वात एकही माणूस नास्तिक नाही तर तो नास्तिक असल्याचे भास होतो. कुणाच्या मानण्यावर देवाचे अस्तित्व अवलंबून नाही. ज्ञानेश्वरीचे व्यसन लागायला हवे. कोणत्याही जिवाचे दिसणे हे देवाचे असणे आहे. अस्तिकांना संकट प्रसंगी देव नक्की मदत करतो.’’ त्यांनी भक्तिमार्गाची पंचसूत्री सांगितली ती अशी की, मनःपूर्वक भजन करावे. भाव धरून कीर्तन करावे. कोणाचीही निंदा करू नये. संतांचा एक एक शब्द महत्त्वाचा आहे. आत्मसंशोधन करावे. आपली निंदा सहन करावी. कोणता संत आपल्या जीवनाचे सोने करील हे सांगता येणार नाही.
लिमये यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. योगेश गागर, दत्ता राक्षे, माजी प्राचार्य सुमेधा खांबेटे, शिरगाव व चिखली येथील शाळेचे शिक्षक व सदस्य यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com