

जुनी सांगवी, ता. २६ : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, सकल हिंदू समाज व हिंदू संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला. यामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल संघटनांनी एकत्रित येत निषेध मोर्चाचे आयोजन केले. विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री धनंजय गावडे, भाजप मंडल अध्यक्ष गणेश निवृत्ती ढोरे,
माजी सिनेट संतोष ढोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदीप बडे, विशाल सांगळे, संजय लोहकरे, पराग सुरेश ढोरे, नीलेश कांबळे, दीपक व्यास, शिवम काळे, उदय राघवाणी, रोहित जाविया, रोहित परदेशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात त्वरीत परत पाठवा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.