एक हजार रुपयांमध्ये 
अष्टविनायक दर्शन यात्रा

एक हजार रुपयांमध्ये अष्टविनायक दर्शन यात्रा

Published on

पिंपरी, ता. २७ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाकडून संकष्टी चतुर्थीनिमित्त १४ जून रोजी पिंपरी-चिंचवड व शिवाजीनगर आगारातून अष्टविनायक दर्शनाकरिता विशेष बस सोडण्यात येणार आहे. नागरिकांसाठी बुधवारपासून (ता. २८) ऑनलाइन आरक्षण सुविधा खुली करण्यात आली आहे.
शिवाजीनगर व पिंपरी आगारातून अष्टविनायक दर्शन बस शनिवारी १४ जून रोजी सकाळी सात वाजता सुटणार आहे. या गाडीचे प्रौढ आणि मुलांकरिता तिकीटदर वेगवेगळे असणार असून, प्रौढांसाठी १ हजार १७४ रुपये तर मुलांसाठी ५७४ रुपयांपर्यंत असतील. ओझर (भक्त निवास) येथे राहण्याची व जेवणाची उत्तम सोय असून, तो खर्च प्रत्येक प्रवाशाने स्वतः करावयाचा आहे. अष्टविनायक दर्शनासाठी ऑनलाइन आरक्षण सुरू झाले असून, महामंडळाचे www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर आणि ॲपवर आरक्षण करता येणार आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

अष्टविनायकसाठी एसटीच्या सर्व योजना लागू होणार
‘महिला सन्मान योजने’अंतर्गत महिलांना आणि ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजने’अंतर्गत ज्येष्ठांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. या सर्व योजनांचा लाभ प्रवाशांना ‘अष्टविनायक दर्शन’साठी घेता येणार आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com