जप्त ४९ वाहनांचा 
होणार ई-लिलाव

जप्त ४९ वाहनांचा होणार ई-लिलाव

Published on

जप्त ४९ वाहनांचा
होणार ई-लिलाव
पिंपरी, ता. २७ ः पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या ४९ वाहनांचा जाहीर ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ जून रोजी सकाळी १२ ते सायंकाळी चारपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयात ई- लिलाव होणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड आरटीओने मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत वाहने जप्त केली आहेत. यातील काही वाहनांवर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, तर काही वाहन मालकांनी कर व दंड न भरल्यामुळे अनेक वर्षांपासून ही वाहने राजगुरूनगर आणि तळेगाव एसटी आगारात आणि आरटीओ कार्यालयात पडून आहेत. यातील एकूण ४९ वाहनांचा १२ जून रोजी ई-लिलाव केला जाणार आहे. ही वाहने पाहण्याकरिता २६ मे ते १० जून या कालावधीत तळेगाव व राजगुरुनगर एसटी आगारात आणि आरटीओच्या कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. ‘वाहने जशी आहे तशी’ या तत्त्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहेत. वाहनांची यादी www.eauction.gov.in या संकेतस्थळावर, पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com