

पिंपरी, ता.१ : ‘‘फॅशनकडे बघू नका. आपली पॅशन लक्षात घ्या. आपला आतला आवाज ऐका. सामाजिक दबावाला बळी पडून करिअरचा निर्णय घेऊ नका.’’, असे मार्गदर्शन एमआयटी अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे ब्रॅंडिंग व कम्युनिकेशनचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल हत्ते यांनी केले.
चिंचवड रागा पॅलेस येथे आयोजित ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’च्या दुसऱ्या दिवसाच्या चर्चासत्रांची सुरुवात डॉ. हत्ते यांच्या ‘स्वप्नपूर्तीकडे पहिले पाऊल : बारावीनंतरचे करिअर मार्गदर्शन’ या विषयावरील व्याख्यानाने झाली. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. हत्ते म्हणाले, ‘‘खूप जण अभियांत्रिकीला प्रवेश घेताना माहिती तंत्रज्ञान (आयटी) व संगणकीय विज्ञान या दोन शाखांना प्रवेश घेण्यास प्राधान्य देतात. जगात सगळ्या प्रकारच्या इंजिनिअरची गरज आहे. त्यामुळे रोबोटिक्स, सिव्हिल, ऑटोमोबाईल्स या शाखांमध्येही तेवढाच वाव आहे. चालू काळात कोणत्या करिअरला जास्त मागणी आहे. हे पाहून दबावाला बळी पडून करिअर निवडले जाते. मात्र, तसे करू नका. आपल्याला जे करायला आवडेल, त्या क्षेत्रात करिअर करा. पालकांनीही आपल्या मुलांना एखादे करिअर निवडण्याची सक्ती करू नका. केवळ अभियांत्रिकीची पदवी मिळवणे म्हणजे पैसा मिळवणे नव्हे.’’
अनेक पालक ११ वी, १२ वी संपल्यावर विद्यार्थ्यांना विविध प्रवेश परीक्षा द्यायला लावतात. मात्र, खूप परीक्षा देऊन करिअर स्थिस्थावर होत नाही. जिथे आवड आहे. तिथेच करिअर करावे. पालकांनी मुलांवर फार भार टाकू नये, असेही त्यांनी सांगितले.
इंजिनिअरिंगच्या पलीकडेही करिअर : अतीतकर
कोणतेही क्षेत्र श्रेष्ठ नाही. तुम्हाला तुमच्या कामाने त्या क्षेत्रात श्रेष्ठ बनायचे आहे. अभियांत्रिकी शाखेच्या पुढेही अनेक क्षेत्रात चांगल्या संधी आहेत. इंजिनिअरिंगच्या पलीकडेही करिअर आहे. मात्र, करिअर चांगले करायचे असेल; तर कौशल्य, ज्ञान व मूल्य या तीन बाबींचा अवलंब करणे गरजेचे आहे. तुमचा करिअरचा मार्ग तुम्ही ओळखायचा आहे. सध्या अॅनिमेशन, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी या अभ्यासक्रमांनाही महत्त्व आहे, असे एमआयटी कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्सच्या उपसंचालक मानसी अतीतकर यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.