‘सकाळ विद्या एक्स्पो’ला विद्यार्थी-पालकांचा भरघोस प्रतिसाद

‘सकाळ विद्या एक्स्पो’ला विद्यार्थी-पालकांचा भरघोस प्रतिसाद
Published on

पिंपरी, ता. १ : दहावीनंतर कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत, कोणते महाविद्यालय निवडावे, विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया काय आहेत, त्यासाठी काय तयारी करायची, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी व पालकांना मिळाली.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सकाळ विद्या एक्स्पो’चा रविवारी (ता.१) समारोप झाला. काळेवाडी येथील रागा पॅलेस येथे पार पडलेल्या या दोन दिवसीय शैक्षणिक प्रदर्शनामध्ये विविध नामवंत शैक्षणिक संस्था व महाविद्यालये यांनी सहभाग घेतला होता. याशिवाय तज्ज्ञ व्यक्तींनी आपल्या क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया, प्रवेश परीक्षा, अभ्यासक्रम, प्लेसमेंट्स, विविघ क्षेत्रांतील भविष्यातील संधी याबाबत इत्यंभूत माहिती दिली. विद्यार्थी व पालकांनीही या चर्चासत्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘‘सकाळच्या सर्वच उपक्रमांत आम्ही सहभागी होतो. हा उपक्रमही अत्यंत कौतुकास्पद आहे. इथे तज्ज्ञांचे मार्गदर्शन खूप छान मिळते आणि त्याचा फायदाही होतो.’’
- रुपाली आहेर, पालक, चिंचवड.

‘‘आम्ही आमच्या मुलासाठी इंजिनिअरिंगचे पर्याय पाहत आहोत. त्याबाबत ज्या शंका होत्या त्या दूर झाल्या आहेत. या प्रदर्शनाचा नक्कीच फायदा होईल.’’
- राजेंद्र म्हस्के, देहूरोड

‘‘मी अकरावी सायन्स शाखेत शिकत आहे. बारावीनंतर काय करता येईल, कोणत्या महाविद्यालयात प्लेसमेंट चांगल्या आहेत, याविषयी खूप महिती मिळाली.’’
- तेजस ढवळे, विद्यार्थी, सांगवी.

‘‘मी आता बारावीची परीक्षा दिली आहे. आपल्या शहरात असणारी महाविद्यालये व तेथील अभ्यासक्रम यांची चांगली माहिती मिळाली. येथे आयोजित करण्यात आलेले सर्वच सेमिनार चांगले होते.’’
- समद्धी पवार, वल्लभनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com