सर्व सुखाचे आगर पंढरपूर कीर्तनकार रोहिणीताई माने परांजपे यांचे प्रतिपादन; ‘सकाळ’ कीर्तन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, ता. ४ : ‘‘संसारी माणूस त्रासलेला आहे. सुखाच्या शोधात आहे. हे सुख संपणारे आहे. शाश्वत सुखासाठी पांडुरंग परमात्म्याची भक्ती करायला हवी. कारण, सर्व सुखाचे आगर पंढरपूर आहे. पंढरीचा पांडुरंग आहे,'''' असा विश्वास कीर्तनकार रोहिणीताई माने परांजपे यांनी व्यक्त केला.
संत ज्ञानेश्वर माउली यांचा सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सव, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठ गमन सोहळा आणि आषाढी वारी यानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. त्यातील तिसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेत रोहिणीताई माने परांजपे बोलत होत्या. त्यांच्या हस्ते श्रीविठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी व अभंगगाथा या ग्रंथाचे पूजन झाले. त्यानंतर त्यांची कीर्तन सेवा झाली. संत तुकाराम महाराज यांच्या,
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी।
कर कटावरी ठेवूनियां ॥
तुळसी हार गळां कासे पीतांबर ।
आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥
मकरकुंडले तळपती श्रवणी ।
कंठी कौस्तुभमणि विराजित ॥
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीनें ॥
या अभंगाचे निरूपण त्यांनी केले.
पंढरपूर आणि पंढरीच्या पांडुरंगाचे महात्म्य वर्णन करताना रोहिणीताई माने परांजपे म्हणाल्या, ‘‘सर्व सुखाचे आगर पंढरपूर आहे. पंढरीचा पांडुरंग आहे. म्हणून सर्व संतांच्या पालख्या आणि भाविक वारकरी पंढरपूरकडे निघाले आहेत. त्यांची वाट पांडुरंग बघत आहे. नामसंकीर्तनात तल्लीन झाले आहेत. उद्या (शनिवारी) सर्व जण पंढरपुरात पोहचतील. भजन, कीर्तनात रमतील. कारण, नवविधा भक्तिंपैकी नामसंकीर्तन ही एक भक्ती आहे. ती भक्ती आपल्यासाठी ‘सकाळ’ने आणली आहे.’’
चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट व आमदार महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन महोत्सवाचे सहप्रायोजक आहेत.
‘सकाळ’कडून ज्ञानाचा प्रकाश
आषाढी एकादशीनिमित्त ‘सकाळ’ने आयोजित केलेला ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ हा कीर्तन महोत्सव भाविक भक्तांसाठी अलौकिक सोहळा आहे. या महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी हजेरी लावलेली आहे. ‘सकाळ’कडून ज्ञानाचा प्रकाश पाडला जात आहे. वाचन संस्कृती जिवंत ठेवली जात आहे. भव्य व दिव्य असा हा कीर्तन महोत्सव उपक्रम आहे,’’ अशा शब्दांत रोहिणीताई माने परांजपे यांनी ‘सकाळ’चे कौतुक केले.
उद्धव महाराज मंडलिक यांचे आज कीर्तन
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवात शनिवारी (ता. ५) सायंकाळी पाच वाजता नेवासे येथील कीर्तनकार उद्धव महाराज मंडलिक यांची कीर्तन सेवा होईल.
रविवारी सकाळी नऊ वाजता सेवा
आषाढी एकादशीनिमित्त रविवारी (ता. ६) सकाळी ९ वाजता पुणे येथील कीर्तनकार सचिन महाराज पवार यांच्या कीर्तन सेवेने महोत्सवाचा समारोप होईल.
सर्वांना विनामूल्य प्रवेश
आषाढी एकादशीनिमित्त ‘सकाळ’ने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे.
....
फोटो ओळ
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड : ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवात निरूपण करताना रोहिणीताई माने परांजपे.
...
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड : ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवात उपस्थित भाविक.
....
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड : ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवात सन्मानित केलेले भाविक.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.