भुयारी मार्गाबरोबरच अंतर्गत रस्त्यांचाही हवा विकास ताथवडेतील भुयारी मार्ग रुंदीकरणाच्या प्रतिक्षेत ः भविष्यात कोंडी वाढण्याची शक्यता
पिंपरी, ता. ५ : पुनवळ्यातील भुयारी मार्गाप्रमाणेच ताथवडेतील भुयारी मार्ग हा कोंडीचे केंद्र ठरलेला आहे. त्यामुळे या भुयारी मार्गाचा विस्तार लवकरात लवकर व्हावा, ही मागणी येथील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. मात्र, येथील वाढती लोकसंख्या पाहता भुयारी मार्गाबरोबरच येथील अंतर्गत रस्ते ही बांधणी गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात या भागातील वाहतूक कोंडीत भर पडू शकते.
शहराच्या पश्चिमेस असणारे ताथवडे हे उपनगर अतिशय वेगाने वाढत आहे. या भागामध्ये अनेक मोठमोठ्या इमारतींची बांधकामे सुरू आहेत. हिंजवडीशी असणारी कनेक्टिव्हिटी, एका बाजूला औंध - रावेत बीआरटीएस मार्ग तर दुसरीकडे मुंबई बंगळूर महामार्ग यामुळे या भागात घर घेण्याकडे तरुणाईचा कल वाढत आहे. त्यामुळे या भागात मोठमोठ्या हाउसिंग सोसायटी उभ्या राहत आहेत. यातील ७० टक्के सोसायटीचे काम सुरू आहे. मात्र, या भागातील अनेक अंतर्गत रस्ते अद्यापही खराब अवस्थेत आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षांमध्ये येथील नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मात्र, वाहन चालक व पादचाऱ्यांसाठी आवश्यक रस्ते, पदपथ, पथदिवे यासारख्या पायाभूत सुविधा न झाल्यास ताथवड्यातील अंतर्गत भागातही वाहतूक कोंडी होण्याची भीती येथील नागरिक व्यक्त करत आहेत.
सेवा रस्त्यांना लागेना मुहूर्त
पुणे बंगळूर महामार्गलगतच्या या भागातील सेवा रस्त्यांचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पिंपरी चिंचवड महापालिका यांनी एकत्रितरीत्या हाती घेतले आहे. याचा कार्यादेश निघूनही हे काम सुरू करण्यात आलेले नाही. सेवा रस्त्याचे रुंदीकरण होणार असल्याने सेवा रस्त्यांची दुरुस्ती गेल्या किमान दीड वर्षापासून झालेली नाही. त्यामुळे ना नवीन रस्ता ना डागडुजी असे चित्र येथे दिसत आहे.
काय करायला हवे
ताथवडेतील सेवा रस्त्याची दुरुस्ती
सेवा रस्त्याचे विस्तारीकरण
औंध- रावेत ‘बीआरटी’ मार्ग ते ताथवडे २४ मीटर रस्त्याचे रखडलेले काम
जीवननगर येथील रस्त्यांचे काम
अंतर्गत रस्ते विकसित करणे
‘‘ताथवडेतील भुयारी मार्ग रुंद होणार, याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ऐकत आहोत. मात्र, अजून काम सुरू झालेले दिसत नाही. दुसरीकडे अंतर्गत रस्त्यांची ही अवस्था फारशी चांगली नाही. जीवन नगर, अशोक नगर भागातील रस्त्यांची कामे रखडलेली आहेत.
- सुजित निकम, रहिवासी
‘‘मुंबई- बंगळूर महामार्गालगतच्या २४ मीटर सेवा रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका यामध्ये जमीन अधिग्रहण करून देणार आहे. त्यातील ८५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. नवीन विकास आराखड्यानुसार ताथवडेतील अंतर्गत रस्तेही बांधण्यात येतील. मात्र, त्याला अजून मान्यता मिळालेली नाही.
मकरंद निकम, मुख्य अभियंता, स्थापत्य विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.